ETV Bharat / state

इचलकरंजी नगरपालिकेच्या आवारात स्वत:ला पेटवून घेणाऱ्या 'त्या' सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू

author img

By

Published : Oct 26, 2020, 3:39 PM IST

Updated : Oct 26, 2020, 5:07 PM IST

नरेश भोरे, असे या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असून दोन दिवसापूर्वी त्यांनी नगरपालिकेला आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याने भोरे यांनी स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

सामाजिक कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
सामाजिक कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर- इचलकरंजी नगरपालिकेत स्वत:ला पेटवून घेतल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. नरेश भोरे, असे या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असून दोन दिवसापूर्वी त्यांनी नगरपालिकेला आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याने भोरे यांनी स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

इचलकरंजीतील सामाजिक कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

या घटनेनंतर संपूर्ण इचलकरंजी शहर हादरले आहे. ४ दिवसापूर्वी इचलकरंजी येथील शहापूर रस्त्यावरून मेलेले डुक्कर घंटागाडीतून नेण्याऐवजी घंटागाडीला बांधून रस्त्यावरून फरफटत ओढून नेले जात होते. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून मृत डुक्कर बांधून ओढत नेणाऱ्या घंटागाडी चालकास अटकाव केला. त्यावरून संबंधित गाडी चालकाने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. तसेच, त्याच्यावर दहशत निर्माण करून भोरे यांना चक्क मेलेले डुकर उचलून घंटागाडीत टाकण्यास भाग पाडले होते.

या घटनेच्या निषेधार्थ भोरे यांनी संबंधितांवर कारवाई व्हावी याबाबत निवेदन दिले होते. मात्र, कारवाई झाली नसल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याचीही दखल घेतली नसल्याने आज भोरे यांनी नगरपालिका परिसरातच अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये ते गंभीररित्या भाजले गेले होते. आजूबाजूच्या नागरिकांनी धाडसाने पुढे येऊन आग विझवली व त्यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान भोरे यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा- जिल्ह्यात राबवणार महसूल लोकयात्रा अभियान; जिल्हाधिकारी दौलत देसाईंची घोषणा

Last Updated : Oct 26, 2020, 5:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.