ETV Bharat / state

Boy Drowning In Well : 15 वर्षीय मुलीने वाचवला विहीरीत बुडणाऱ्या 3 वर्षीय मुलाचा जीव

author img

By

Published : Oct 29, 2022, 1:47 PM IST

3 वर्षीय मुलगा विहिरीत बुडत (boy drowning in well in Kolhapur) होता. मात्र याच वेळी भल्या भल्या मोठ्या लोकांना जे करता आले नाही, ते एका 15 वर्षीय मुलीने करून दाखवले. 'त्या' मुलाचा जीव वाचवला (15 year old girl saved 3 year old boy) आहे.

girl saved 3 year old boy
मुलीने 3 वर्षाच्या मुलाला वाचवले

कोल्हापुर : कोल्हापुरातील दानोळी भागातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बाजूला दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारत पाकिस्तान मॅचमध्ये सर्व जण गुंग असताना दुसऱ्याबाजूला एक 3 वर्षीय मुलगा विहिरीत बुडत (boy drowning in well in Kolhapur) होता. मात्र याच वेळी भल्या भल्या मोठ्या लोकांना जे करता आले नाही, ते एका 15 वर्षीय मुलीने करून दाखवले. 'त्या' मुलाचा जीव वाचवला (15 year old girl saved 3 year old boy) आहे. यामुळे सध्या तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. नम्रता कलगोंडा कटारे, असे या मुलीचे नाव असून क्षणाचाही विचार न करता तिने खोल आणि कटोकाट भरलेल्या विहिरीत उडी घेत त्या मुलाचा जीव वाचवला आहे.


घटनाक्रम : दानोळी-जयसिंगपूर रोडलगतच्या कटारे मळ्यात कटारे कुटुंब राहते. या कुटुंबात ओजस कटारे वय वर्ष 5 आणि शौर्य कटारे वय वर्ष 3 असे दोन बालके आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच भारत पाकिस्तान मॅच पर पडली. अटीतटीच्या या सामन्यात संपूर्ण देशाचे लक्ष आपल्या टेलिव्हिजनमध्ये होते. तशीच काही परिस्थिती कटारे कुटुंबियात देखील होते. शिवाय नुकतेच ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने येथील सर्व ओढे, नाले, वीहिरी तुडुंब भरून वाहत होते. अश्या परिस्थितीत ओजस आणि शौर्य हे बाहेरील अंगणात असलेल्या विहिरीजवळ खेळत होते. आणि याच वेळी अचानक शौर्य विहिरीत पडला आणि बुडू लागला. यावेळी तेथे मोठे कोणीही नसलेले पाहून ओजस शौर्य विहिरीत बुडाला म्हणत आरडाओरडा करू (3 year old boy drowning in well) लागला.

थेट विहिरीत उडी : हे ऐकून सर्वजण धावत विहिरीवर पोहोचले. मात्र कोणालाही काही समजत नव्हते, अशातच या दोघांची आत्या नम्रता कळकोंडा कटारे वय वर्ष 15 ही केवळ नववीत शिकणाऱ्या मुलीने कोणताही वेळ न घालवता थेट विहिरीत उडी घेतली. बघताक्षणी तीन वर्षाच्या शौर्याला बाहेर काढले. यामुळे शौर्याचे जीवही वाचले. मात्र भल्या भल्या मोठ्यांना जे सुचले नाही, ते यात नववीत शिकणाऱ्या पोरीने करून दाखवल्याने नम्रताचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. नम्रता सध्या दानोळी येथील दानोळी हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत असून या घटनेची माहिती मिळताच दानोळी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रेया वांजोळे आणि अध्यक्ष राजकुमार पारज यांनी तिने दाखविलेल्या शौर्याचे कौतुक करत तिचा सत्कार केला (15 year old girl saved 3 year old boy in Kolhapur) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.