ETV Bharat / state

Raosaheb Danve : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची परिस्थिती अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा खराब - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

author img

By

Published : May 24, 2023, 9:48 PM IST

Raosaheb Danve
Raosaheb Danve

रावसाहेब दानवे, केंद्रिय राज्यमंत्री यांनी जालना कृषीउत्पन्न बाजार समीतीची परिस्थिती अंबड कृषीउत्पन्न बाजार समीतीपेक्षा खराब असल्याचे वक्तव्य केले आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम दानवे बोलत होते.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

अंबड : जालना कृषीउत्पन्न बाजार तसेच अंबड कृषी उत्पन्न बाजार समीतीचा पैसा नेमका जातो कुठे असा प्रश्न उपस्थित केला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना दानवे यांनी जालना मार्केट कमेटीची पोलखोल केली आहे.

अंबड मार्केट कमेटीटचा पैसा गेला कुठे : अंबड मार्केट कमेटीला आलेला पैसा जातो कुठे? भोकरदन मार्केट कमेटीपेक्षा अंबड मार्केट कमेटीची परिस्थिती खराब आहे. अंबड मार्केट कमेटी पेक्षाही जालना मार्केट कमिटीची परिस्थिती आजूनच खराब आहे. जेथून दुसऱ्या मार्केट कमेटीला पैसा येतो तेथूनच या मार्केट कमेटीला सुद्धा पैसे येतो. - रावसाहेब दानवे, केंद्रिय राज्यमंत्री

मार्केट कमेटी डबघाईला : अंबड मार्केट कमेटीचा पैसा योग्य माणसाच्या हातात नसल्यामुळे मार्केट कमीटीला नुकसान भोगावे लागत आहे. मार्केट कमेटी सांभाळणारे लोक चांगले नसल्यामुळे जालना मार्केट कमिटीची हालत अंबड मार्केट कमिटी पेक्षा सुद्धा खराब आहे. एकेकाळी जालना, लातूर या महत्वाच्या बाजारपेठा होत्या. आज त्या या लोकांमुळे डबघाईला आलेल्या आहेत, अशी टीका दानवे यांनी अंबड मार्केट कमीटी तसेच जालना मार्केट कमीटीवर केली आहे.

कौशल्य नसल्याने मार्केट कमीट्याचे हाल : जालन्याची मार्केट कमेटी एनपीए म्हणजेच नॉन परफॉर्मींग अॅसेटमध्ये गेलेली आहे. मार्केट कमीटी कोणाच्याही ताब्यात असो. या संस्था सांभाळता आल्या पाहीजे. त्यासाठी ज्यांच्या ताब्यात या संस्था आहेत त्यांच्यामध्ये कौशल्य असणे अत्यंत गरजेचे असल्याचे दानवे म्हणाले. पुढे बोलताना दानवे म्हणाले की, मार्केट कमेटीला शासनाकडून पैसे येत नाहीत. त्या साठी स्वतः पैशांचे स्त्रोत निर्माण करावे लागतात. त्या साठी योग्य हातामध्ये मार्केट कमेटी असणे आवश्यक आहे.

बाजार समितीच्या मागे ईडीचा ससेमिरा : मार्केट कमेटीला संचालक मंडळ, कर्मचारी हेच डबघाईला आणत असतात, असेही दानवे म्हणाले. दानवेंच्या या भाषणाने उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाला. गेल्या दोन ते तीन टर्म पासून जालना कृषी ऊत्पन्न बाजार समिती माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या ताब्यात आहे. तसेच मागील वर्षी कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यावरून जालना कृषी ऊत्पन्न बाजार समिती राज्यभरात चर्चेतसुध्दा आली होती. या मार्केट कमेटीमध्ये फार मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. ही मार्केट कमेटी राज्यात दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर येत असून नावाजलेली मार्केट कमेटी आहे.

जालना मार्केट कमिटीचे उपसभापती हे भास्कर आबा दानवे असून रावसाहेब पाटील दानवे यांचे ते बंधू आहेत. जालना मार्केट कमिटी ही एनपीए ( नॉन परफॉर्मींग असेट )झालेली आहे असे, दानवे म्हणतात. तर, दुसरीकडे त्यांचेच बंधू उपाध्यक्ष असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. संचालक मंडळ, कर्मचारी हेच मार्केट कमिटीला बुडवत आसतात असा टोला दानवेंनी हाणला होता. दानवे यांचा निशाणा हा त्यांच्या बंधुंवर आहे की माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावर आहे? हे मात्र जिल्ह्यातील नागरीकांना कळाले नाही. सध्या भाजपाकडून जालना विधानसभा लढवण्यासाठी भास्कर आबा दानवे ईच्छुक असून त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. मागील तीन वर्षापासून भास्कर आबा दानवे यांनी शहरी भागासोबतच ग्रामीण भागात जनसंपर्क वाढवला आहे.

हेही वाचा :

  1. PM Modi Degree : केजरीवाल आणि संजय सिंह न्यायालयात हजर झाले नाहीत, या तारखेला होणार पुढील सुनावणी
  2. Sanjay Raut On Pm : राष्ट्रपतींना नव्या संसद भवनच्या उद्धाटनाला न बोलवणे हा देशाचा अपमान, विरोधी पक्ष करणार बहिष्कार - संजय राऊत
  3. Ramoji Film City : 'रामोजी फिल्म सिटी'सारखी फिल्म सिटी संपूर्ण देशात बनली पाहिजे!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.