ETV Bharat / state

पैशाच्या वादातून उमरेंची हत्या केल्याची आरोपींची कबूली

author img

By

Published : May 14, 2021, 4:50 PM IST

पैशाची देवाणघेवाण आणि जून्या वादातून एका हत्या करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पैशाच्या वादातून हत्या
पैशाच्या वादातून हत्या

जालना - शहरातील पथकर नाका ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्त्यावर काल (गुरुवारी) भर दिवसा एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. याप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यांनी हत्येची कबूली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पैशाच्या वादातून ही हत्या केल्याचे आरोपींनी सांगितले.

लक्ष्मण उमरे ऊर्फ कट्टा पेटी (वय ४५) यांची काल हत्या करण्यात आली. लक्ष्मण हे औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार पुरवण्याचे काम करत होते. याप्रकरणी पोलिसांना उमरे यांच्यासोबत काम करणाऱ्या श्याम चिकटे यांच्यावर हत्येचा संशय आला. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले आणि अनिल काळे यांच्या पथकाने चिकटे याला सुंदर नगर येतून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पसार झाला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करत पवार गोडाऊनजवळ त्याला ताब्यात घेतले. श्याम चिकटेला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याचा मित्र जितेंद्र आरसूळ (रा. बदनापूर) याच्या मदतीने लक्ष्मण उमरेची हत्या केल्याची कबूली दिली. पैशाची देवाणघेवाण आणि जून्या वादातून हत्या केल्याचे आरोपीने सांगितले. दरम्यान पोलिसांनी या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.