ETV Bharat / state

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी ई-पास बंधनकारक

author img

By

Published : Jun 9, 2021, 4:33 PM IST

सोमवारपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनलॉक झाले आहे. असे असले तरीही काही जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी आजही पास बंधनकारक करण्यात आलेला आहे.

ई पास
ई पास

जालना - सोमवारपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनलॉक झाले आहे. असे असले तरीही काही जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी आजही पास बंधनकारक करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी ई-पास बंधनकारक

चार गटांच्या जिल्ह्याची परिस्थिती
सोमवारपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनलॉक केले आहे. त्यानुसार चार गट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या गटामध्ये दहा जिल्हे असून सर्व सुरू राहणार आहे. दुसऱ्या गटामध्ये दोन जिल्हे आहेत. जिथे 50 टक्के व्यवहार सुरू राहणार आहेत. त्यामध्ये नंदुरबार आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ तिसऱ्या गटामध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या जिल्हामध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांना ई-पास शिवाय प्रवेश द्यायचा किंवा नाही याचे अधिकार त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र उर्वरित चौथ्या गटातील आठही जिल्ह्यांना त्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यासाठी ई पास अत्यंत आवश्यक आहे आणि ते जिल्हे आहेत बुलडाणा, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर यांचा समावेश आहे.

जालन्यातून निर्गमीत केलेल्या पाचची परिस्थिती
जालना पोलीस अधीक्षक कार्यालयातून सुमारे 42 हजार नागरिकांनी ई पासची मागणी केली होती. त्यामध्ये 25 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांना हे पास नाकारण्यात आले. त्यांची संख्या 26 हजार एवढी आहे. तर साडेसोळा हजार प्रवाशांना हे पास मंजूर करण्यात आले आहेत आणि सुमारे 16 हजार 300 प्रवाशांनी या पासचा उपयोग करून प्रवास केलेला आहे.

हेही वाचा - 'नवनीत राणा तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा देखील अवमान केला'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.