ETV Bharat / state

जालना एमआयडीसीत 'कट्टा-पेटी' नावाने प्रसिद्ध व्यावसायिकाची भर दिवसा हत्या

author img

By

Published : May 14, 2021, 10:48 AM IST

जालन्यात गुरूवारी भरदिवसा बारा वाजता खून झाला. लाकडाच्या दांड्याने उमरे यांना ठार केले असावे आणि नंतर त्यांचा मृतदेह बाजूलाच असलेल्या एका खोलीच्या पाठीमागे ओढून नेला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घटनास्थळावर एक मोठा लाकडाचा दांडा सापडला आहे.

jalna crime news
जालन्यात भरदिवसा एक जणाचा खून

जालना - औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार पुरविणाऱ्या लक्ष्मण घुमरे या 45 वर्षीय व्यक्तीचा गुरूवारी भरदिवसा बारा वाजता खून झाला. ते "कट्टा पेटी" या नावाने औद्योगिक वसाहतीमध्ये परिचित होते.

जालन्यात खून

जालना औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या पथकर नाक्यापासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे एक रस्ता जातो. तसा हा रस्ता वर्दळीचा आहे मात्र आज ईद निमित्त सरकारी सुट्टी असल्यामुळे हा रस्ता सामसूम होता. याची संधी साधत अज्ञात इसमांनी उमरे यांचा खून केल्याची घटना घडली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तीन व्यक्ती येथे बसलेले होते. त्यावेळी उमरे यांची मोटरसायकल देखील येथे होती. दरम्यान साडेअकरा ते दिडच्यामध्ये हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

कामगार पुरविण्याचा व्यवसाय -

लक्ष्मण घुमरे हे औद्योगिक वसाहतीमध्ये विविध कारखान्यांना आवश्यक असणारे कामगार पुरविण्याचा व्यवसाय करत होते. दरम्यान गुरूवारी 11 वाजेच्या सुमारास ते बस स्थानक परिसरातील इंद्रायणी हॉटेल येथून काही कामगार घेऊन औद्योगिक वसाहतकडे निघाले होते.

लाकडाच्या दांड्याने मारहाण -

खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाली होती. लाकडाच्या दांड्याने उमरे यांना ठार केले असावे आणि मृतदेह बाजूलाच असलेल्या एका खोलीच्या पाठीमागे ओढून नेला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घटनास्थळावर एक मोठा लाकडाचा दांडा सापडला आहे.

तपास चक्रे गतिमान करण्याच्या सूचना -

कदीम जालना पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक सुरू होती. त्याचवेळी उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांना या घटनेची माहिती मिळता. ही बैठक आटोपती घेत त्यांनी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. हे पोहोचेपर्यंत चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीसही तेथे आलेले होते. दरम्यान घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी देखील भेट देऊन तपासाची चक्रे अधिक गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा - शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे मिळेनात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.