ETV Bharat / state

खळबळजनक.. अल्पवयीन मुलीचा लावला तीनवेळा विवाह.. अन् आता चौथ्या लग्नाची तयारी, आईसह 12 जणांवर गुन्हा

author img

By

Published : Dec 5, 2021, 3:43 PM IST

Updated : Dec 5, 2021, 4:09 PM IST

जालन्यात एका अल्पवयीन मुलीचा चौथ्यांदा बालविवाह (Minor girl gets married three times) लावण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यापूर्वी पीडितेची तीन लग्न झाली आहेत व सध्या घरच्यांनी पैसे घेऊन चौथ्या लग्नाची तयारी सुरू केल्याची तक्रार पीडितेने पोलिसात केली आहे. (Child marriage in jalna) या तक्रारीवरून पोलिसांनी आई, दोन भाऊ व तीन पतींसह एकूण 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Child marriage in jalna
Child marriage in jalna

जालना - भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिची आई व भावानेच पैसे घेऊन तीन वेळा बालविवाह (Minor girl gets married three times) करून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान घरच्यांची पुन्हा चौथ्यांदा बळजबरीने विवाह (Child marriage in jalna) लावून देण्याची तयारी सुरु असल्याचे समजताच पीडित मुलीने तेथून पळ काढून पोलीस ठाणे गाठले अन् आपली सुटका करून घेतली.

याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून आई, भाऊ व तीन पतीसह बारा जणांविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे समजते.

अल्पवयीन मुलीचा लावला तीनवेळा विवाह

तीन वर्षात तीन लग्ने -

याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह अंदाजे तीन वर्षांपूर्वी तिच्या आई आणि भावांनी शेंदूर्णी येथील एका मुलाशी (ता . जामनेर, जिल्हा जळगाव) पैसे घेऊन लावून दिला होता. येथे एक महिना राहिल्यानंतर माहेरच्यांनी तिला परत आणले व पुन्हा सासरी पाठविले नाही. त्यानंतर आठ महिन्यांनी पुन्हा पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील एका व्यक्तीकडून पैसे घेऊन दुसरा विवाह लावून दिला. येथे तीन महिने राहिल्यानंतर तिच्या भावाने तिला परत भोकरदनला आणले. त्यांनतर पुन्हा पाच महिन्यांनी भोकरदन शहरातील एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तिसरा विवाह लावला. त्याच्यासोबत पीडिता मुलगी औरंगाबाद येथे एक वर्ष राहिली. मात्र , पतीसोबत वाद झाल्याने पीडिता चार महिन्यांपूर्वी माहेरी भोकरदन येथे आली होती.

चौथ्या लग्नाची तयारी -

दरम्यान, आई व भावांकडून पुन्हा चौथ्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे व जळगाव जिल्ह्यातील पाहुणे पाहायला येणार असल्याचे तिला समजले. पीडित मुलीने चौथ्या लग्नाला विरोध केला असता तिच्या भावांनी तिला मारहाण केली. त्यामुळे आपण लग्न केले नाही तर आपल्या जीवाला धोका असल्याचे तिच्या लक्षात येताच तिने चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क केला. पोलिसांनी लगेच तिला भेटून चौकशी केली. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आई , दोन भाऊ, तीन पतींसह 12 नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : Dec 5, 2021, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.