ETV Bharat / state

जालना लोकसभेसाठी ६४.०५ टक्के मतदान, वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर..?

author img

By

Published : Apr 24, 2019, 11:09 AM IST

जालना लोकसभेसाठी मंगळवारी रात्री उशिरा मिळालेल्या आकडेवारीनुसार ६४.०५ टक्के मतदान झाले आहे.

जालना लोकसभा

जालना - जालना लोकसभेसाठी मंगळवारी रात्री उशिरा मिळालेल्या आकडेवारीनुसार ६४.०५ टक्के मतदान झाले आहे. दुपारच्या टप्प्यात वाढलेले मतदान नक्की कोणाच्या पारड्यात पडले हे पाहण्यासाठी तब्बल एक महिना उमेदवारांसह मतदारांनाही वाट पाहावी लागणार आहे.

जालना लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी झालेल्या मतदानामध्ये प्रमुख लढतीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे या तिघांमध्ये ही लढत आहे. २०१४ मध्ये देखील या तिघांमध्ये लढत होऊन रावसाहेब दानवे यांचा विजय झाला होता. यावेळी कोणाचा विजय होईल हे पाहण्यासाठी मात्र २३ मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आज झालेल्या मतदानामध्ये १२ लाख २ हजार ९५८ मतदारांनी मतदानाची ६४. ०५ एवढी टक्केवारी गाठली आहे.

Intro:जालना लोकसभेसाठी रात्री उशिरा मिळालेल्या आकडेवारीनुसार 64.05टक्के मतदान झाले आहे दुपारच्या टप्प्यात वाढलेले हे मतदान मतदारांनी कोणाच्या पारड्यात टाकले हे पाहण्यासाठी तब्बल एक महिना उमेदवारांसह मतदारांनाही वाट पाहावी लागणार आहे


Body:जालना लोकसभा मतदार संघासाठी आज झालेल्या मतदानामध्ये प्रमुख लढतीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ,काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे,आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर शरदचंद्र वानखेडे या तिघांमध्ये ही लढत होणार आहे .विशेष म्हणजे 2014 मध्ये देखील या तिघांमध्ये ही लढत होऊन रावसाहेब दानवे यांचा विजय झाला होता .यावेळी कोणाचा विजय होईल हे पाहण्यासाठी मात्र 23 मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आज झालेल्या मतदानामध्ये बारा लाख 2हजार 958मतदात्यांनी मतदान करून मतदानाची 64. 05एवढी टक्केवारी गाठली आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.