ETV Bharat / state

शिवभोजन थाळीची संख्या वाढवा, बदनापूरच्या नागरिकांची मागणी

author img

By

Published : Apr 20, 2020, 7:23 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन आहे. या काळात हातावर पोट असणाऱ्या गरीब लोकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ठिकाणी शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली आहे. बदनापूर शहराताही शिवभोजन योजना सुरू केली आहे. मात्र, येथे थाळी संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे.

jalna
शिवभोजन थाळीची संख्या वाढवा

जालना - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे भुकेल्यांना म माध्यमातून जेवण मिळत आहे. मात्र, बदनापूर शहरातील गरजूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या ठिकाणी शासनाने थाळी संख्या वाढवावी, जेणेकरून गरजूंना त्याचा फायदा होईल, अशी मागणी होत आहे.

शिवभोजन थाळीची संख्या वाढवा, नागरिकांची मागणी



कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे उपासमार होऊ नये, म्हणून व मोलमजुरी करणारे व हातावर पोट असणाऱ्यांना जेवण मिळावे म्हणून शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. बदनापूर शहरात संत सावता महाराज मंदिराजवळ शिवभोजन थाळी केंद्र मंजूर झाले असून, मागील 10 दिवसांपासून ते सेवा बजावत आहे.

jalna
शिवभोजन थाळीची संख्या वाढवा, नागरिकांची मागणी

या केंद्राला 50 थाळीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या केंद्राचे चालक योगेश खैरे हे दुपारी 11 ते 3 सेवा देत असतात. मात्र, सद्यस्थितीत भुकेल्याची संख्या अधिक आहे व शहरात केंद्र असल्याने 50 थाळी ताबडतोब संपून जातात. काही रस्त्याने पायी जाणारेही याचा लाभ घेतात. 5 रुपये किंमत असल्याने या थाळीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून या 50 थाळ्या सुरुवातीच्या 1 ते दोन तासातच संपत आहेत. या परिस्थितीत योगेश खैरे हे त्यांच्यातर्फेही 10 ते 15 थाळ्या त्यानंतर सेवा म्हणून देतात. सध्याची परिस्थितीत सोशल डिस्टनसचे पालन करत येथे शिवभोजन दिले जाते. गरजूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्यामुळे व गरजू लोक थाळी पार्सल घेऊन जातात. शहराच्या जवळ असल्याने या केंद्राला 50 थाळी कमी पडत असून, शासनाने या केंद्राला उद्दिष्ट वाढवून दिल्यास निराधाराच्या भोजनाची व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे बदनापूर येथील शिवभोजन थाळी केंद्राला थाळी संख्या वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

jalna
शिवभोजन थाळीची संख्या वाढवा, नागरिकांची मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.