ETV Bharat / state

जालना लोकसभा मतदारसंघातून २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

author img

By

Published : Apr 9, 2019, 12:32 PM IST

लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून २९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे आता २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक आहेत.

निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे

जालना - लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून २९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे आता २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक आहेत. यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.

जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे

निवडणुकीत २० उमेदवार असल्यामुळे मतदान करण्यासाठी मशीनही २ लागणार आहेत. निवडणूक रिंगणात उतरलेल्या राष्ट्रीय पक्षांमधील उमेदवारांच्या यादीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे विलास अवताडे, भाजपचे रावसाहेब दानवे, बहुजन समाज पक्षाचे महेंद्र सोनवणे उभे आहेत. तर नोंदणीकृत राजकीय पक्षांमध्ये उत्तम राठोड (आसरा लोकमत पार्टी, निशानी बॅटरी), गणेश शंकर चांदोडे (अखिल भारतीय सेना, गॅस सिलेंडर), त्रिंबक बाबुराव जाधव (स्वतंत्र भारत पक्ष ,कप आणि बशी), प्रमोद बाबुराव खरात (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट, पार्टी एअर कंडिशनर), फेरोज अली (बहुजन मुक्ती पार्टी, खाट), डॉ. शरदचंद्र वानखेडे (वंचित बहुजन आघाडी, शिट्टी) उभे आहेत.

अपक्ष उमेदवारांमध्ये अण्णासाहेब उगले (अपक्ष, बॅट), अनिता खंदाडे (अपक्ष, दूरदर्शन), अरुण चव्हाण (अपक्ष ,पेनाची निब), रहीम शेख (अपक्ष, ऑटो रिक्षा), ज्ञानेश्वर नाडे (अपक्ष, ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी), योगेश गुल्लापल्ली (अपक्ष लॅपटॉप), रतन लांडगे (अपक्ष, करणी), राजू गवळी (अपक्ष, रोड रोलर), शहादेव पालवे (अपक्ष, चावी), सपकाळ लिलाबाई (अपक्ष ,गॅस शेगडी), श्याम शिरसाट (अपक्ष ऊस शेतकरी) यांचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये नामदेव श्रीपतराव जंजाळ, अखील अहमद शेख, शेख रफीक शेख लतीफ, नशीब खान रुफखान पठाण, राहुल शिंदे, प्रभाकर भुसारे, जगन्नाथ रिठे, सरफराज पठाण ,एडवोकेट किशोर राऊत, यांचा समावेश आहे.

Intro:जालना लोकसभा मतदारसंघात भावी खासदार म्हणून वीस उमेदवार रिंगणात राहिले आहेत.तर नऊ उमेदवारांनी माघार घेतली आहे यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.या वेळी उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर उपस्थित होते.


Body:जालना लोकसभा मतदार संघातून 29 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते त्यापैकी 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे आता वीस उमेदवार रिंगणात आहेत .त्यामुळे आता एक ऐवजी मशीनही दोन लागणार आहेत .निवडणूक रिंगणात उतरलेल्या राष्ट्रीय पक्षांमधील उमेदवारांच्या यादीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे विलास अवताडे ,भारतीय जनता पार्टीचे रावसाहेब दानवे ,बहुजन समाज पार्टीचे महेंद्र सोनवणे तर नोंदणीकृत राजकीय पक्षांमध्ये उत्तम राठोड (आसरा लोकमत पार्टी, बॅटरी) गणेश शंकर चांदोडे( अखिल भारतीय सेना, गॅस सिलेंडर) त्रिंबक बाबुराव जाधव (स्वतंत्र भारत पक्ष ,कप आणि बशी) प्रमोद बाबुराव खरात (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट, पार्टी एअर कंडिशनर )फेरोज अली(बहुजन मुक्ती पार्टी, खाट)डॉ. शरदचंद्र वानखेडे (वंचित बहुजन आघाडी, शिट्टी) अण्णासाहेब उगले (अपक्ष, बॅट )अनिता खंदाडे (अपक्ष, दूरदर्शन) अरुण चव्हाण,(अपक्ष ,पेनाची निब )रहीम शेख (अपक्ष,ऑटो रिक्षा) ज्ञानेश्वर नाडे (अपक्ष, ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी) एडवोकेट योगेश गुल्लापल्ली (अपक्ष लॅपटॉप) रतन लांडगे (अपक्ष ,करणी )राजू गवळी (अपक्ष ,रोड रोलर) शहादेव पालवे( अपक्ष, चावी) सपकाळ लिलाबाई (अपक्ष ,गॅस शेगडी) श्याम शिरसाट(अपक्ष ऊस शेतकरी )यांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये नामदेव श्रीपतराव जंजाळ, अखील अहमद शेख ,शेख रफीक शेख लतीफ, नशीब खान रुफखान पठाण ,राहुल शिंदे, प्रभाकर भुसारे, जगन्नाथ रिठे,सरफराज पठाण ,एडवोकेट किशोर राऊत, यांचा समावेश आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.