ETV Bharat / state

Officers Caught In ACB trap At Jalna : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; दोन अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले

author img

By

Published : Jul 17, 2022, 10:42 AM IST

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ( Anti Corruption Bureau ) लावलेल्या सापळ्यात एकाच वेळी 2 अधिकारी अडकले आहेत. जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील ( Jalna Collector Office ) जिल्हा विशेष लेखा परिक्षक सेवादास राघोबाजी कांबळे यांच्यासह त्यांच्याच कार्यालयातील उपलेखा परिक्षक राजेश मुख्त्यारसिंग परिहार यांनी 9 हजार रुपयांची लाच घेतली. लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले आहे.

Jalna Collector Office
जालना जिल्हाधिकारी कार्यालयत

जालना - जालना जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या लावलेल्या सापळ्यात एकाच वेळी 2 अधिकारी अडकले ( 2 officers trapped )आहेत. दोघांनी सेवानिवृत्त तक्रारदाराकडून 12 हजारांची लाच मागितली (12 thousand bribe demanded ) होती. त्यावर त्यांनी लाटचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता त्यांनी ही कारवाई केली. सेवादास राघोबाजी कांबळे, राजेश मुख्त्यारसिंग परिहार यांच्यावर (दि. 16 ) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले- जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील ( Jalna Collector Office ) जिल्हा विशेष लेखा परिक्षक सेवादास राघोबाजी कांबळे यांच्यासह त्यांच्याच कार्यालयातील उपलेखा परिक्षक राजेश मुख्त्यारसिंग परिहार यांनी 9 हजार रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या ( Anti Corruption Bureau ) पथकाने त्यांना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध कायद्यान्वे शनिवारी सेवादास राघोबाजी कांबळे, राजेश मुख्त्यारसिंग परिहार यांच्यावर (दि. 16 ) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

एकूण 12 हजारांची लाच मागितली - याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे सहकारी संस्था या कार्यालयातून दि. 31 मे 2022 रोजी लेखा परिक्षक श्रेणी - 2 या पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणार्‍या प्रोव्हीजनल पेंशन, ग्रच्युयटी बील व जि.आय.एस.बील मंजुर करण्यासाठी अर्ज केला होता. या बीलाच्या मंजुरीसाठी सेवादास राघोबाजी कांबळे यांनी 10 हजार रुपये तर राजेश मुख्त्यारसिंग परिहार यांनी 2 हजार रुपयाची मागणी केली होती. परंतु, तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. दिलेल्या तक्रारीप्रामणे जालना आणि औरंगाबाद येथे सापळा लावण्यात आला. त्यावेळी सेवादास कांबळे व राजेश परिहार यांनी लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले.

दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - दि. 15 जुलै रोजी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा लावला असता सेवादास राघोबाजी कांबळे यांनी 7 हजार रुपये तर राजेश मुख्त्यारसिंग परिहार यांनी 2 हजार रुपये घेण्याचे मान्य करुन ती रक्कम राजेश परिहार यांनी स्वीकारली. त्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले असून त्यांच्या ताब्यातून लाचेची घेतलेली 9 हजार रुपयाची रक्कम जप्त ( 9 thousand rupees seized ) केली आहे. सदरील दोन्ही अधिकाऱ्यांवर कदिम जालना पोलीस ठाण्यात भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Trade Associations Strike In Amravati : जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांचा संप, लाखोंची उलाढाल ठप्प

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.