ETV Bharat / state

जळगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रे सील

author img

By

Published : Jan 12, 2021, 5:25 PM IST

जिल्ह्यात येत्या १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण २ हजार ७७४ मतदान यंत्र लागणार आहेत. ही यंत्रे तहसील कार्यालयांकडे सुपूर्द केली आहेत.

Voting Machine Jalgaon
मतदान यंत्र बातमी जळगाव

जळगाव - जिल्ह्यात येत्या १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण २ हजार ७७४ मतदान यंत्र लागणार आहेत. ही यंत्रे तहसील कार्यालयांकडे सुपूर्द केली आहेत. आज तहसील कार्यालयात ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांच्या याद्या लावून यंत्रे सील करण्यात आली. त्यानंतर सर्व यंत्रे स्टोअर रूमला रवाना करण्यात आली. मतदानाच्या एक दिवस आधी मतदान यंत्रे केंद्रांवर पोहोचवली जाणार आहेत.

माहिती देताना जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील

हेही वाचा - 'वॉटरग्रेस प्रकरणी तोंड उघडले तर अधिकारीच येणार गोत्यात'

१३ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती -

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात २ हजार ४१२ मतदान केंद्र आहेत. त्यावर १३ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २० हजार २६४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यात २८८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते, तर १९ हजार ९७६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. माघारीच्या दिवशी ६ हजार १२९ उमेदवारांनी माघार घेतली होती. जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सध्या ७ हजार २१३ जागांसाठी १३ हजार २४७ उमेदवार रिंगणात आहेत.

कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आले प्रात्यक्षिक -

तहसील कार्यालयांकडून आज मतदान यंत्रांमध्ये ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांच्या याद्या लावण्यात आल्या. गाव व मतदान केंद्रनिहाय मतदान यंत्रे तयार करण्यात आली. उमेदवारांच्या नावाची यादी निवडणूक चिन्हासह मतदान यंत्रावर लावण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांना मतदानाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. जळगाव तालुक्यासाठी शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात ही प्रक्रिया पार पडली.

हेही वाचा - मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिका आयुक्तांना कुत्र्यांच्या पिल्लांची भेट!

तालुकानिहाय पाठविलेली मतदान यंत्रे

तालुका--एकूण मतदान केंद्रे--आवश्यक सी.यू.--आवश्यक बी.यू.

जळगाव- १७०- १९६- १९६

जामनेर- २३३- २६८- २६८

धरणगाव- १२२- १४०- १४०

भडगाव- ९९- ११४- ११४

रावेर- १६५- १९०- १९०

यावल- १७९- २०६- २०६

बोदवड- ८०- ९२- ९२

अमळनेर- १५४- १७७- १७७

पाचोरा- २९५- ३३९- ३३९

भुसावळ- ११८- १३६- १३६

एरंडोल- ११८- १३६- १३६

पारोळा- १३०- १५०- १५०

चाळीसगाव- २३७- २७३- २७३

मुक्ताईनगर- १५१- १७४- १७४

चोपडा- १६१- १८५- १८५

एकूण- २४१२- २७७४- २७७४

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.