ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या केवळ २१.३ टक्के पाऊस; भीषण पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता

author img

By

Published : Jul 16, 2019, 8:05 AM IST

जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. २२ जून ते ७ जुलैपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस पडला. मात्र, गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ २१.३ टक्के पाऊस झाला आहे. यामुळेच जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भीषण पाणिटंचाईची उद्भवण्याची दाट शक्यता आहे.

जिल्ह्यात भीषण पाणिटंचाई उद्भवण्याची दाट शक्यता

जळगाव - जिल्ह्यात आतापर्यंत ९२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यावर्षी पाऊस उशिराने दाखल झाल्याने पूर्वहंगामी कापसाच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. पूर्वहंगामी कापसाचे क्षेत्र तब्बल ६० टक्क्यांनी घटले असून ते केवळ १४ ते १५ हजार हेक्टर एवढे आहे. खरिपात होणाऱ्या हंगामी कापूस लागवडीवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही. हंगामी कापूस लागवड अपेक्षेप्रमाणे साडेचार लाख हेक्टरवर झाली आहे. जिल्ह्याच्या एकूण साडेसात लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र हे हंगामी कापसाचेच आहे. उडीद, मूग या कडधान्य पिकांचे क्षेत्रही नेहमीप्रमाणे आहे. यावर्षी ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे. तर मक्याचे क्षेत्र घटले आहे. गेल्यावर्षी मक्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्याचप्रमाणे यावर्षी मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेत मक्याऐवजी ज्वारीच्या पेरणीला पसंती दिली. त्याचप्रमाणे तेलवर्गीय पिकांमध्ये सोयाबीनचे क्षेत्रही ७० टक्क्यांनी घटले आहे. अनेक शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन या पिकांच्या ऐवजी ज्वारी पेरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात हंगामी कापसानंतर ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक आहे.

गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. विशेषत: जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे या तालुक्यातील पाणीटंचाईची झळ काहीअंशी कमी झाली. त्याचप्रमाणे विदर्भासह मध्यप्रदेशात तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने तापी नदी दुथडी भरून वाहू लागली. तापीला पाणी आल्याने जळगाव, भुसावळ, रावेर, यावल या तालुक्यातील दुष्काळी गावांना मोठा दिलासा मिळाला. मध्यंतरी भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे १२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले होते. हतनूरमधून २७ हजार क्यूसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, आता पावसाने दडी मारल्याने हा विसर्ग थांबवण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा पाणि टंचाई उदभवणार आहे. जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात चांगला पाऊस झाला असला तरी पश्चिम पट्टा मात्र अद्यापही कोरडाच आहे. आता पाऊस लांबल्याने पश्चिम पट्ट्यात दुबार पेरणीचे संकट उदभवले आहे. सध्या जळगाव जिल्ह्यातील १८४ गावात १५८ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. यात अमळनेर तालुक्यात टँकरची संख्या सर्वाधिक आहे.

जिल्ह्यातील ७ धरणे अद्यापही कोरडी-
जळगाव जिल्ह्यात हतनूर, गिरणा व वाघूर ही ३ मोठी धरणे आहेत. या तिन्ही धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी आजमितीस केवळ ११.२४ टक्के इतकी आहे. जिल्ह्यातील एकूण १३ मध्यम प्रकल्पांपैकी ७ धरणे कोरडीठाक पडली आहेत. जिल्ह्याच्या दुष्काळमुक्तीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सुटण्यासाठी ही सर्व धरणे भरण्याची गरज आहे. अन्यथा यावर्षीही जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भीषण पाणिटंचाई उद्भवण्याची दाट शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यातील आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी-
जळगाव- १३१.३ मि.मी.
जामनेर- २०६.० मि.मी.
एरंडोल- १८१.८ मि.मी.
धरणगाव- ११५.७ मि.मी.
भुसावळ- १३६.९ मि.मी.
यावल- १३१.६ मि.मी.
रावेर- १५०.४ मि.मी.
मुक्ताईनगर- १७०.८ मि.मी.
बोदवड- १६६.४ मि.मी.
पाचोरा- १९०.४ मि.मी.
चाळीसगाव- ११४.६ मि.मी.
भडगाव- १०८.७ मि.मी.
अमळनेर- ९५.० मि.मी.
पारोळा- ११८.५ मि.मी.
चोपडा- १००.४ मि.मी.
एकूण- २२२८.४ मि.मी.


जळगाव जिल्ह्यातील मोठे प्रकल्प आणि त्यातील पाणीसाठा-
हतनूर- १७.१८ टक्के
गिरणा- ७.३५ टक्के
वाघूर- १३.३४ टक्के
एकूण- ११.२४ टक्के

Intro:जळगाव
जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. २२ जून ते ७ जुलैपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस पडला. मात्र, गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने दांडी मारली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ २१.३ टक्के पाऊस झाला आहे.Body:जिल्ह्यात आतापर्यंत ९२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यावर्षी पाऊस उशिराने दाखल झाल्याने पूर्वहंगामी कापसाच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. पूर्वहंगामी कापसाचे क्षेत्र तब्बल ६० टक्क्यांनी घटले असून ते केवळ १४ ते १५ हजार हेक्टर एवढे आहे. खरिपात होणाऱ्या हंगामी कापूस लागवडीवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही. हंगामी कापूस लागवड अपेक्षेप्रमाणे साडेचार लाख हेक्टरवर झाली आहे. जिल्ह्याच्या एकूण साडेसात लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र हे हंगामी कापसाचेच आहे. उडीद, मूग या कडधान्य पिकांचे क्षेत्रही नेहमीप्रमाणे आहे. यावर्षी ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे. तर मक्याचे क्षेत्र घटले आहे. गेल्यावर्षी मक्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्याचप्रमाणे यावर्षी मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेत मक्याऐवजी ज्वारीच्या पेरणीला पसंती दिली. त्याचप्रमाणे तेलवर्गीय पिकांमध्ये सोयाबीनचे क्षेत्रही ७० टक्क्यांनी घटले आहे. अनेक शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन ऐवजी ज्वारी पेरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात हंगामी कापसानंतर ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक आहे.

गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. विशेष करून जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे या तालुक्यातील पाणीटंचाईची झळ काहीअंशी कमी झाली. त्याचप्रमाणे विदर्भासह मध्यप्रदेशात तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने तापी नदी दुथडी भरून वाहू लागली. तापीला पाणी आल्याने जळगाव, भुसावळ, रावेर, यावल या तालुक्यातील दुष्काळी गावांना मोठा दिलासा मिळाला. मध्यंतरी भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे १२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले होते. हतनूरमधून २७ हजार क्यूसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, आता पावसाने दडी मारल्याने हा विसर्ग थांबवण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा टंचाई उदभवणार आहे. जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात चांगला पाऊस झाला असला तरी पश्चिम पट्टा मात्र अद्यापही कोरडाठाक आहे. आता पाऊस लांबल्याने पश्चिम पट्ट्यात दुबार पेरणीचे संकट आहे. सध्या जळगाव जिल्ह्यातील १८४ गावात १५८ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहेत. यात अमळनेर तालुक्यात टँकरची संख्या सर्वाधिक आहे.
 
जिल्ह्यातील ७ धरणे अद्यापही कोरडीठाक-

जळगाव जिल्ह्यात हतनूर, गिरणा व वाघूर ही ३ मोठी धरणे आहेत. या तिन्ही धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी आजमितीस केवळ ११.२४ टक्के इतकी आहे. जिल्ह्यातील एकूण १३ मध्यम प्रकल्पांपैकी ७ धरणे कोरडीठाक पडली आहेत. जिल्ह्याच्या दुष्काळमुक्तीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सुटण्यासाठी ही सर्व धरणे भरण्याची गरज आहे. अन्यथा यावर्षीही जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भीषण परिस्थिती  उदभवण्याची शक्यता आहे.
 
जळगाव जिल्ह्यातील आतापर्यंतच्या पावसाची आकडेवारी अशी-

जळगाव- १३१.३ मि.मी.
जामनेर- २०६.० मि.मी.
एरंडोल- १८१.८ मि.मी.
धरणगाव- ११५.७ मि.मी.
भुसावळ- १३६.९ मि.मी.
यावल- १३१.६ मि.मी.
रावेर- १५०.४ मि.मी.
मुक्ताईनगर- १७०.८ मि.मी.
बोदवड- १६६.४ मि.मी.
पाचोरा- १९०.४ मि.मी.
चाळीसगाव- ११४.६ मि.मी.
भडगाव- १०८.७ मि.मी.
अमळनेर- ९५.० मि.मी.
पारोळा- ११८.५ मि.मी.
चोपडा- १००.४ मि.मी.
एकूण- २२२८.४ मि.मी.Conclusion:जळगाव जिल्ह्यातील मोठे प्रकल्प व त्यातील पाणीसाठा

हतनूर- १७.१८ टक्के
गिरणा- ७.३५ टक्के
वाघूर- १३.३४ टक्के
एकूण- ११.२४ टक्के
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.