ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा ; पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतातूर

author img

By

Published : Jul 2, 2019, 6:15 PM IST

जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे. त्यापैकी आतापर्यंत २५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये पेरणी झाल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत पेरणी झालेल्या क्षेत्रात सर्वात जास्त १५ ते १६ हजार हेक्टर क्षेत्र हे पूर्वहंगामी कापसाचे आहे.

जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाची अपेक्षा

जळगाव - राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्यातील १५ पैकी २-३ तालुके वगळले तर अन्य तालुक्यांमध्ये अजूनही पावसाने हजेरी लावलेली नाही. बाजारात खते, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पण पुरेसा पाऊस झालेला नसल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत.

जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाची अपेक्षा

राज्यात मागील आठवड्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, जळगाव जिल्ह्यात अद्यापही पाऊस दमदार पाऊस झालेला नाही. ३ ते ४ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, जामनेर, भुसावळ, मुक्ताईनगर, जळगाव या तालुक्यांत चांगला पाऊस झाला आहे. आता रावेर, यावल हे तालुका वगळता कुठेही पाऊस झालेला नाही. अमळनेर, धरणगाव, पारोळा, एरंडोल, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या तालुक्यांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.

जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे. त्यापैकी आतापर्यंत २५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये पेरणी झाल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत पेरणी झालेल्या क्षेत्रात सर्वात जास्त १५ ते १६ हजार हेक्टर क्षेत्र हे पूर्वहंगामी कापसाचे आहे. त्या खालोखाल क्षेत्र हे मका, ज्वारी, बाजरी तसेच कडधान्य पिकांचे आहे. यावर्षीही जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र कापूस लागवडीखालील राहणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. २२ जून रोजी आर्द्रा नक्षत्रास सुरुवात झाल्यानंतर राज्यात मान्सूनचे आगमन झाले. जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी चांगला पाऊस झाला. आता मान्सून सक्रिय होईल, या अपेक्षेने जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली आहे. परंतु सध्या पाऊसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

खते, बियाणे बाजारात शुकशुकाट -

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला खते व बियाण्यांचा साठा उपलब्ध आहे. मात्र, पाऊस नसल्याने खते व बियाणे बाजाराकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. खते व बियाणे खरेदीला अत्यल्प प्रतिसाद असून बाजारात सर्वत्र शुकशुकाट आहे.

अद्यापही पेरणीलायक पाऊस नाही -

गेल्या वर्षी जून अखेरीस जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या २२.९ टक्के पाऊस झाला होता ; परंतु यावर्षी जून अखेरीस फक्त १७.२ मि.मी. म्हणजे वार्षिक सरासरीच्या केवळ २.५ टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत झालेला पाऊस पेरणीलायक नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस असा -

जळगाव- ५९.७ मि.मी., जामनेर- १४६.१ मि.मी., एरंडोल- १०४.० मि.मी., धरणगाव- ५८.९ मि.मी., भुसावळ- ७६.४ मि.मी., यावल- ७२.५ मि.मी., रावेर- ७७.७ मि.मी., मुक्ताईनगर- १०५.० मि.मी., बोदवड- १२२.६ मि.मी., पाचोरा- ९०.० मि.मी., चाळीसगाव- ६८.१ मि.मी., भडगाव- ४३.२ मि.मी., अमळनेर- ३६.१ मि.मी., पारोळा- ४३.० मि.मी., चोपडा- ३६.५ मि.मी., एकूण- ११४२.६ मि.मी.

Intro:जळगाव
राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील १५ पैकी दोन ते तीन तालुके वगळले तर अन्य तालुक्यांमध्ये अजून पावसाने हजेरी लावलेली नाही. बाजारात खते, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पण पुरेसा पाऊस झालेला नसल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत.Body:राज्यात मागील आठवड्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, जळगाव जिल्ह्यात अद्यापही पाऊस हवा तसा बरसलेला नाही. तीन ते चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, जामनेर, भुसावळ, मुक्ताईनगर, जळगाव या तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. आता रावेर-यावल वगळता कोठेही पाऊस झालेला नाही. अमळनेर, धरणगाव, पारोळा, एरंडोल, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.

जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टर क्षेत्र पेरणीलायक अाहे. त्यापैकी अातापर्यंत २५ हजार हेेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत पेरणी झालेल्या क्षेत्रात सर्वात जास्त १५ ते १६ हजार हेक्टर क्षेत्र हे पूर्वहंगामी कापसाचे आहे. त्या खालोखाल क्षेत्र हे मका, ज्वारी, बाजरी तसेच कडधान्य पिकांचे आहे. यावर्षीही जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र कापूस लागवडीखालील राहणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज अाहे. २२ जून राेजी अार्द्रा नक्षत्रास सुरुवात झाल्यानंतर राज्यात मान्सूनचे अागमन झाले. जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी चांगला पाऊस झाला. आता मान्सून सक्रिय होईल, या अपेक्षेने जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली आहे. परंतु पाऊस पडत नसल्याने दुबार पेरणीचे संकट आहे.

खते, बियाणे बाजारात शुकशुकाट-

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला खते व बियाण्यांचा साठा उपलब्ध आहे. मात्र, पाऊस नसल्याने खते व बियाणे बाजाराकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. खते व बियाणे खरेदीला अत्यल्प प्रतिसाद असून बाजारात सर्वत्र शुकशुकाट आहे.

अद्यापही पेरणीलायक पाऊस नाही-

गेल्या वर्षी जून अखेरीस जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या २२.९ टक्के पाऊस झाला हाेता; परंतु यावर्षी जून अखेरीस फक्त १७.२ मि.मी. म्हणजेच वार्षिक सरासरीच्या केवळ २.५ टक्के पाऊस झाला. अातापर्यंत झालेला पाऊस पेरणीलायक नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे अाहे.Conclusion:जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस असा-

जळगाव- ५९.७ मि.मी., जामनेर- १४६.१ मि.मी., एरंडोल- १०४.० मि.मी., धरणगाव- ५८.९ मि.मी., भुसावळ- ७६.४ मि.मी., यावल- ७२.५ मि.मी., रावेर- ७७.७ मि.मी., मुक्ताईनगर- १०५.० मि.मी., बोदवड- १२२.६ मि.मी., पाचोरा- ९०.० मि.मी., चाळीसगाव- ६८.१ मि.मी., भडगाव- ४३.२ मि.मी., अमळनेर- ३६.१ मि.मी., पारोळा- ४३.० मि.मी., चोपडा- ३६.५ मि.मी., एकूण- ११४२.६ मि.मी.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.