ETV Bharat / state

निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तीन उमेदवारांना नोटीस

author img

By

Published : Oct 21, 2019, 5:14 AM IST

अमळनेरचे भाजपचे उमेदवार शिरीष चौधरी, चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीश वळवी आणि पाचोऱ्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरेश पाटील यांनी आचारसंहितेचा भंग, आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी  त्यांच्यावर कारवाईचे आदेश काढले आहेत. या सर्वांनी जाहिरातींचे प्रमाणीकरण न करता जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र

जळगाव - विधानसभा निवडणुकीत प्रसिद्ध करायच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्वप्रमाणित करून घेणे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बंधनकारक आहे. मात्र, तरीही पाचोरा, अमळनेर, चोपडा येथील तीन उमेदवारांनी जाहिराती संनियंत्रण समितीकडून प्रमाणीकरण न केल्याने आचारसंहितेचा भंग, आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. यामुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी त्यांच्यावर कारवाईचे आदेश काढले आहेत. दोन दिवसात या उमेदवारांना खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करायच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येत नाही. तरीही अमळनेरचे भाजपचे उमेदवार शिरीष चौधरी, चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीश वळवी आणि पाचोऱ्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरेश पाटील यांनी जाहिरातींचे प्रमाणीकरण न करता जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत.

हेही वाचा - विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज; मतदान केंद्रांवर साहित्य रवाना

याप्रकरणी त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा, आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. झालेला खर्च उमेदवाराच्या खर्चात धरला जाणार आहे.

Intro:Please use file photo or logo

जळगाव
विधानसभा निवडणुकीत प्रसिद्ध करायच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्वप्रमाणित करून घेणे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बंधनकारक आहे. मात्र, तरीही पाचोरा, अमळनेर, चोपडा येथील तीन उमेदवारांनी जाहिराती संनियंत्रण समितीकडून प्रमाणीकरण न केल्याने आचारसंहितेचा भंग, आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाईचे आदेश आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. दोन दिवसात या उमेदवारांना खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे.Body:कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करायच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येत नाही. तरीही अमळनेरचे भाजपचे उमेदवार शिरीष चौधरी, चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीश वळवी आणि पाचोऱ्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरेश पाटील यांनी आज जाहिरातींचे प्रमाणीकरण न करता जाहिराती प्रसिद्ध केल्या आहे.Conclusion:याप्रकरणी त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा, आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. झालेला खर्च उमेदवाराच्या खर्चात धरला जाणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.