ETV Bharat / state

भाजप उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होणार नाही - खासदार ए. टी. पाटील

author img

By

Published : Apr 8, 2019, 6:24 PM IST

भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारात आपला कोणत्याही प्रकारचा सहभाग राहणार नाही, अशी स्पष्टोक्ती जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांनी दिली आहे.

भाजप उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होणार नाही - खासदार ए. टी. पाटील

जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारात आपला कोणत्याही प्रकारचा सहभाग राहणार नाही, अशी स्पष्टोक्ती जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांनी दिली आहे.

खासदार ए. टी. पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे खासदार पाटील यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. ते म्हणाले की, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी स्मिता वाघ यांचे तिकीट पक्षाने कापल्यानंतर भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांना नव्याने उमेदवारी देण्यात आली आहे. मी त्यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची खोटी माहिती पसरवली जात आहे. मात्र, ज्यांनी आपली उमेदवारी कापण्याचे षडयंत्र रचून घात केला, त्यांच्या प्रचारात सहभाग घेणार नसल्याचे खासदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

भाजप उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होणार नाही - खासदार ए. टी. पाटील

त्यामुळे खासदार पाटील प्रचारात येतील, असा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलेला दावा किती खरा ठरतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, भाजपमध्ये सुरू असलेली अंतर्गत बंडाळी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पथ्यावर पडणार असल्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघात खासदार पाटील यांचे वलय चांगले आहे. या विधानसभा मतदारसंघाची भूमिका आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत विजयाची समीकरणे ठरवत आली आहे. त्यामुळे खासदार पाटील यांची नाराजी भाजपसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.

Intro:जळगाव
जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारात आपला कोणत्याही प्रकारचा सहभाग राहणार नाही, अशी स्पष्टोक्ती जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान भाजप खासदार ए.टी. पाटील यांनी दिलीय.Body:खासदार ए. टी. पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असल्याने खासदार पाटील यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. ते पुढे म्हणाले की, आपलं राजकीय वैर असळलेल्या भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी स्मिता वाघ यांचं तिकीट पक्षाने कापल्यानंतर आपण नव्याने उमेदवारी जाहीर करण्यात आलेले भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची खोटी माहिती पसरविली जातेय. मात्र, ज्यांनी ज्यांनी आपली उमेदवारी कापण्याचं षडयंत्र रचून आपला घात केला, त्यांच्या प्रचारात आपण सहभाग घेणार नसल्याचं खासदार पाटलांनी स्पष्ट केलंय. यामुळं खासदार पाटील प्रचारात येतील, असा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलेला दावा किती खरा होतो? हे नजीकच्या या काळात कळेलंच.Conclusion:भाजपतील बंडाळी देवकरांच्या पथ्यावर पडणार-

दरम्यान, भाजपमध्ये सुरू असलेली अंतर्गत बंडाळी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्या पथ्यावर पडणार असल्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघात खासदार पाटील यांचे वलय चांगले आहे. या विधानसभा मतदारसंघाची भूमिका आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत विजयाची समीकरणं ठरवत आली आहे. त्यामुळे खासदार पाटील यांची नाराजी भाजपसाठी धोकेदायक असल्याचं बोललं जातंय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.