ETV Bharat / state

VIRAL VIDEO : कोंबडीच्या पिल्लाची शिकार करणाऱ्या मांजरीची माणसाने केली हत्या!

author img

By

Published : Oct 21, 2021, 8:01 PM IST

जळगाव शहरातील हरिविठ्ठलनगर भागात राहणारे पुष्कराज बाणाईत हे आपल्या परिवारासह राहतात. परिसरातील भटक्या मांजरींचे ते संगोपन करतात. त्यांच्या मांजरीने शेजाऱ्याच्या पाळलेल्या कोंबड्यांची शिकार केली. त्याच रागातून तेथील माथेफिरुने मांजरीला गोळी मारली.

Man kills cat who ate chickens
Man kills cat who ate chickens

जळगाव - आपल्या कोंबडीच्या पिल्लाची मांजरीने शिकार केल्याच्या रागातून एका माथेफिरूने मांजरीची गोळी घालून हत्या केली. ही घटना जळगावात घडली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, निर्दयी माथेफिरूने केलेल्या कृत्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. त्याच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी प्राणीप्रेमींकडून होत आहे.

मांजरीची माणसाने केली हत्या

जळगाव शहरातील हरिविठ्ठलनगर भागात राहणारे पुष्कराज बाणाईत हे आपल्या परिवारासह राहतात. परिसरातील भटक्या मांजरींचे ते संगोपन करतात. बाणाईत यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने कोंबड्या पाळल्या असून, त्याच्या कोंबडीच्या पिल्लाची मांजरीने शिकार केली. याच्या रागातून बाणाईत यांच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या माथेफिरूने छर्रेची बंदूकीद्वारे मांजरीच्या कपाळावर निशाणा साधत गोळी मारली. त्यात मांजरीचा तडफडून जीव गेला. दरम्यान, मांजरीच्या कपाळावर गोळी लागल्याने मांजरीचा मृत्यू झाला. सदर माथेफिरूविरुद्ध कठोर कारवाईची प्राणीप्रेमींकडून मागणी केली जात आहे.

हेही वाचा - धक्कादायक : जळगावात अतिक्रमण कारवाई सुरू असताना पोलिसांना जबर मारहाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.