ETV Bharat / state

khadse Vs Mahajan: खडसे हे केवळ पावशेर उरले, बोदवडच्या प्रचार सभेत महाजन-खडसेंची फटकेबाजी

author img

By

Published : Dec 20, 2021, 5:01 PM IST

बोदवड नगरपंचायत (Bodwad Nagar Panchayat) निवडणुकीच्या प्रचारात भाजपा व राष्ट्रवादीच्या सभेत माजी मंत्री गिरीश महाजन (Former Minister Girish Mahajan) व एकनाथ खडसे ( Former Minister Eknath Khadse) यांनी एकमेकांवर (hit each other) फटकेबाजी केली. खडसे यांनी शेरोशायरी करत महाजनांवर टीकास्त्र सोडले. याला उत्तर देताना महाजनांनी 'खडसे हे केवळ पावशेर उरले' त्यांनी मुशायरात जायला पाहिजे अशी टीका केली.

khadse Vs Mahajan
महाजन/खडसें

जळगाव: मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो, अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास असे म्हणत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बोदवड नगरपंचायतच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसें यांच्यावर जोरदार टिका केली. त्याच वेळी समोर खडसेंचीही सभा सुरू होती त्यांनीही शेर शायरी करत महाजनांवर जाेरदार टीका केली.

महाजन/खडसें

मी मतदारसंघाचा नेता म्हणे
बोदवडचे बस स्टँड आहे की भंगार दुकान. रस्त्यांची दुर्दशा, पाण्याची समस्या आणि हे म्हणतात मी मतदारसंघाचा नेता. १५ वर्ष लाल दिव्याची गाडी अन् १२ खाते मिळाले. पण मतदारसंघाचा विकास करू शकले नाही. एक भोंगे नाही ४ भोंगे लावा लोकांवर त्याचा परिणाम होणार नाही. महाजन म्हणाले लोकांनी तुम्हाला शिक्षा दिलीय. कमिशनसाठी लल्लु पंजु भांडतात कसा होईल विकास.आता कितीही आवाज चढवला तुमची धार बोथट झाली आहे.आता तुमचं खरं नाही, चाटा मारायचा टाईम गेला. २ नंबरचे धंदे टेंडरमध्ये पैसे कमविले तुमचं मतदार संघात काहीच राहिल नाही. दुकानदारी बंद करा असा टोलाही त्यांनी खडसेंना लगावला.

म्हणून जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली
सरकारने दारू स्वस्त केली आणि प्यायला पाणी नाही, आता लोकांनी दारू प्यायची का अशा शब्दांतही सरकारवर टीकेची झोड उठवली. जनतेची सेवा करावी लागते. सेवा केली नाही म्हणून जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली तुमच्या होमटाऊन असलेल्या मुक्ताईनगर येथे आमदार म्हणून आमचा माणूस आहे. घरी बसुन नुसतीच पदे भोगली आणि कामे मात्र शुन्य, नुसतच मी हे केल हे ते केले असे सांगुन होत नाही. असे म्हणत त्यांनी खडसेंना आव्हान दिले.

स्वत ला तुम्ही सव्वाशेर म्हणवून घेता
समोरील प्रचारसभेत खडसे शेरोशायरी करत असल्याचे ऐकताच महाजनांनी शेरोशायरी करता स्वत ला तुम्ही सव्वाशेर म्हणवून घेतात. मात्र आता तुमच्या दबदबा राहिलेला नाहीये तुम्ही सव्वाशेर नाही आता पावशेर झाले असा टोलाही त्यांनी लगावला. मला कुणी मोठं केलं नाही विकासकामांमुळे म्हणून मोठा झालो. लोकांची सेवा केली म्हणुन आतापर्यंत लोकांनी निवडुन दिले. या महाविकास आघाडीने सरकारने तोंडाला नुसतीच तोंडाला पाने पुसली. तीन वर्षांत एकही भरती झाली नाही अन जी भरती झाली त्यातही भ्रष्टाचार असे म्हणत म्हाडा असो की आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील पेपरफुटीवरुन महाजनांनी सरकारवर निशाना आणला.

हेही वाचा - Subhash Desai Attacked Amit Shah : केंद्र व गुजरातकडून महाराष्ट्राचे वैभव पळवण्याचा प्रकार -सुभाष देसाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.