ETV Bharat / state

भाजपच्या प्रचारसभेला विलंब ; उपस्थितांच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग !

author img

By

Published : Apr 16, 2019, 3:18 PM IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जाहीर सभेत काय बोलतात, याची प्रचंड उत्सुकता आहे. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने भुसावळ मधील संतोषी माता हॉलमध्ये जमले आहेत. मात्र, सभा अजूनही सुरू झालेली नाही. भर उन्हात अनेक जण सकाळी 11.30 वाजेपासून सभेच्या नियोजित ठिकाणी उपस्थित झाले आहेत. परंतु, पावणे दोन वाजेपर्यंत सभेला सुरुवात झालेली नव्हती.

भाजपच्या प्रचारसभेला विलंब ; उपस्थितांच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग !

जळगाव - रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आज भुसावळ येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी दुपारी १२ ची वेळ निश्चित करण्यात आली होती. परंतु, तब्बल दोन तास उलटून देखील सभा सुरू झालेली नाही. त्यामुळे उपस्थित नागरिकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. उपस्थित नागरिक माघारी जाऊ नयेत म्हणून आयोजकांनी मनोरंजनासाठी पथनाट्य आणि जादूचे प्रयोग असे कार्यक्रम घेऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

भाजपच्या प्रचारसभेला विलंब ; उपस्थितांच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जाहीर सभेत काय बोलतात, याची प्रचंड उत्सुकता आहे. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने भुसावळमधील संतोषी माता हॉलमध्ये जमले आहेत. मात्र, सभा अजूनही सुरू झालेली नाही. भर उन्हात अनेक जण सकाळी ११.३० वाजेपासून सभेच्या नियोजित ठिकाणी उपस्थित झाले आहेत. परंतु, पावणे दोन वाजेपर्यंत सभेला सुरुवात झालेली नव्हती.

या सभेला माजीमंत्री एकनाथ खडसे हे देखील उपस्थित राहणार आहेत. आजारपणामुळे त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. आता उपचार घेऊन ते परतले असून त्यांच्याही भाषणाकडे सर्वाचे लक्ष असणार आहे.

Intro:जळगाव
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आज भुसावळ येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी दुपारी 12 वाजेची वेळ निश्चित करण्यात आली होती. परंतु, तब्बल दोन तास उलटून देखील सभा सुरू झालेली नाही. त्यामुळे उपस्थित नागरिकांचा चांगलाच हिरमोड झाला. उपस्थित नागरिक माघारी जाऊ नये म्हणून आयोजकांनी मनोरंजनासाठी पथनाट्य आणि जादूचे प्रयोग असे कार्यक्रम घेऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.


Body:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जाहीर सभेत काय बोलतात, याची प्रचंड उत्सुकता आहे. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने भुसावळातील संतोषी माता हॉलमध्ये जमले आहेत. मात्र, सभा अजूनही सुरू झालेली नाही. भर उन्हात अनेक जण सकाळी 11.30 वाजेपासून सभेच्या नियोजित ठिकाणी उपस्थित झाले. परंतु, पावणे दोन वाजेपर्यंत सभेला सुरुवात झालेली नव्हती.


Conclusion:या सभेला माजीमंत्री एकनाथ खडसे हे देखील उपस्थित राहणार आहेत. आजारपणामुळे त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. आता उपचार घेऊन ते परतले असून त्यांच्याही भाषणाकडे लक्ष असणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.