ETV Bharat / state

Jalgaon Gold News: खरेदीचा 'सोनेरी' मुहूर्त; दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुवर्णनगरीत सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 5:23 PM IST

Jalgaon Gold News
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त

Jalgaon Gold News : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा (Dussehra 2023) सणाच्या निमित्तानं सोने खरेदीसाठी उत्तम मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोन्याची खरेदी करणं शुभ मानलं जातं. तसंच धन संपत्तीचा लाभ मिळतो अशी अनेकांची श्रद्धा आहे. याच निमित्तानं जळगावात आज सकाळपासून ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली आहे.

माहिती देताना सोने व्यावसायिक आकाश भंगाळे

जळगाव Jalgaon Gold News : 'दसरा' सण (Dussehra 2023) हा सर्वत्र देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी सोनं खरेदी केलं तर घरात कायम भरभराट राहते अशी नागरिकांची भावना आहे. दसरा सणाचा मुहूर्त साधण्याकरता जळगावच्या सुवर्णनगरीत सकाळपासूनच सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सोन्याचे भाव 61 हजार : 57 हजार रुपयांपर्यंत सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसानंतर सोन्याच्या दरात तब्बल चार हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे भाव हे 61 हजार रुपयांपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. मात्र, आज दसराचा सण आहे. आजच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व असल्यामुळं आज थोडं फार कमी प्रमाणात सोनं खरेदीसाठी ग्राहकांनी सकाळपासूनच सराफ बाजारातील दुकानांमध्ये गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं आहे.

सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर सोने व्यवसायिकांकडूनही वेगवेगळ्या आकाराची आपट्याची पानं, दागिने हे ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात ग्राहकांचे विशेष आकर्षण असलेलं सोन्याचं पान हे सुद्धा प्रत्येक वजनामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. भाव वाढ झाली असली तरी, सकाळपासूनच ग्राहकांचा ओघ पाहायला मिळतोय. दिवसभर ग्राहकांच्या गर्दीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

ग्राहकांनी दिल्या प्रतिक्रिया : दुकानात आलेल्या एका ग्राहकांनी असं म्हटलं की, 'दसऱ्याच्या निमित्ताने सोनं खरेदी करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. या मुहूर्तावर सोने खरेदी करणे भरभराट देणारे मानले जाते.' तर दुसऱ्या ग्राहकांनी असं म्हटलं आहे की, ही एक चांगली गुंतवणूक देखील असल्याने आम्ही आजचा मुहूर्त साधण्यासाठी आलो आहोत.

हेही वाचा -

  1. Gurupushyamrut Yog : गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोने खरेदीला ग्राहकांची मोठी गर्दी; भाव कमी झाल्याचा आनंद
  2. Government Gold Bond Scheme : आजपासून सरकार देत ​​आहे स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, 6 महिन्यांत मिळेल व्याज...
  3. Gold Silver Rates Today : सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या सोने चांदीचे दर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.