ETV Bharat / state

Gold Price Hike : इस्रायल-हमास युद्धाचा सुवर्णनगरीवर परिणाम; ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचा भाव वधरला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 10:36 PM IST

Gold Price Hike : नवरात्रीचा (Navratri 2023) उत्सव सुरू आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा दसरा २४ ऑक्टोबरला आहे. दसरा (Dussehra 2023) हा अर्धमावर धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सोने खरेदीसाठी नागरिकांची सराफ दुकानात गर्दी बघायला मिळते. परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर (Jalgaon Gold Rate) झाला आहे.

Gold Price Hike
सोन्याचे भावात वाढ

इस्राईल युद्धाचा जळगाव सुवर्णनगरीवरही परिणाम

जळगाव Gold Price Hike : संपूर्ण देशात सुवर्णनगरी म्हणून जळगावची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक स्तरावरील इस्रायल हमास (Israel Hamas War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा जळगावच्या सुवर्णनगरीवर मोठ्या परिणाम (Jalgaon Gold Rate) झाल्याच पाहायला मिळत आहे. पितृपक्षामध्ये 57 हजार रुपये पर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर पुन्हा वधारला आहे. अवघ्या पंधरा दिवसांमह्ये सोन्याच्या भावामध्ये 4 हजार 200 रुपयांनी वाढ झाली आहे. संध्या सोन्याचे दर 61 हजार 200 रुपयांपर्यंत जावून पोहचले आहेत. तर दिवाळीच्या (Diwali 2023) दिवसांमध्ये अनेक जण सोने खरेदी करतात. त्यामुळे आगामी काळात सोन्याची चांगली मागणी वाढण्याची शक्यता आहे.


सोन्यात गुंतवणूक वाढली : इस्रायल हमास यांच्यात युद्ध सुरू आहे, त्याचा परिणाम हा सोन्याच्या बाजारावर सुद्धा परिणाम झाला आहे. सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक समजली जात असल्यानं इतर ठिकाणची गुंतवणूक ही सोन्यात वळती झाली आहे. इतरही फंड हे सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आणि सोन्याचे दर हे 61 हजार 200 रुपयांपर्यंत पोहचले. सोन्याचे भावात वाढ झाली असली तरी, सुवर्ण नगरीतील सराफा दुकानामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. आगामी काळात दसरा दिवाळी सण आहे, लग्न सराई सुद्धा सुरू होणार आहे. त्यामुळे भाव वाढ झाली असली तरी, त्याचा ग्राहकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.


सुवर्णनगरीत सोने खरेदीसाठी गर्दी : भाव वाढल्यामुळे बजेट कोलमडले असले तरी, पुन्हा आणखीन भाव वाढ होईल या भीतीनं नागरिक सोने खरेदीसाठी गर्दी करत आहेत. भाव वाढ झाल्याने ज्या प्रमाणात खरेदी करायची होती, त्याप्रमाणात खरेदी करताना हात आखडते घ्यावे लागत आहे. ग्राहक बजेटमध्ये सोने खरेदी करत आहेत, भाव काही प्रमाणात कमी व्हावेत अशी अपेक्षा ही ग्राहकांमध्ये व्यक्त होत आहे.

हेही वाचा -

  1. Gold Rate Increased In Jalgaon जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे भाव भिडले गगणाला
  2. सोन्याचे भाव गगनाला भिडले; काय म्हणतात नाशकातील महिला...
  3. जळगावच्या सराफ बाजारात गुरुपुष्यामृत योग असूनही मंदीच; ग्राहकांचा सोने खरेदीत हात आखडता
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.