ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, केळी उत्पादक शेतकऱ्यांना जोरदार फटका

author img

By

Published : May 30, 2019, 11:59 PM IST

Updated : May 31, 2019, 9:47 AM IST

जिल्ह्यातील रावेर तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक मोठा फटका बसला आहे.

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

जळगाव - जिल्ह्यातील रावेर तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. वादळाचा जोर जास्त असल्याने अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे उडाले आहेत. तर काही ठिकाणी मातीच्या कच्च्या घरांची पडझड देखील झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

रावेर तालुक्यातील सावखेडा, खिरोदा, चिनावल, विवरा परिसरात गुरुवारी दुपारी अचानक ढगाळ वातावरण होते. सायंकाळी वादळासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास पाऊस पडत होता. वादळामुळे घरे, गुरांच्या गोठ्यांवरील पत्रे उडाले. तर पावसामुळे शेतांमध्ये असलेल्या जनावरांच्या कडब्याचे मोठे नुकसान झाले. सावखेडा गावात वादळाचा जोर अधिक होता. याठिकाणी वादळामुळे विजेचे खांबदेखील कोसळले. विजेच्या तारा तुटल्याने वीजप्रवाह खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.

केळीला वादळाचा फटका-

या मान्सूनपूर्व पावसाचा सर्वाधिक फटका केळी बागांना बसला आहे. सावखेडा, खिरोदा शिवारातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील केळी बागा आडव्या झाल्या आहेत. त्यातील अनेक बागांमधील केळी निसवणीवर आलेली होती. मात्र, वादळामुळे घड तुटले, केळीचे खोड अर्ध्यातून मोडले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावला आहे.

jalgaon
जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या बागांची रावेरच्या तहसीलदार देवगुणे यांनी पाहणी केली. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी तहसीलदार देवगुणे यांनी दिली.

Intro:जळगाव
जिल्ह्यातील रावेर तालुक्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वादळ वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळाचा जोर जास्त असल्याने अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे उडाली. काही ठिकाणी मातीच्या कच्च्या घरांची पडझड देखील झाली आहे. या अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये केळी बागा आडव्या झाल्या आहेत.Body:रावेर तालुक्यातील सावखेडा, खिरोदा, चिनावल, विवरा परिसरात गुरुवारी दुपारी अचानक ढगाळ वातावरण होते. सायंकाळी वादळासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास पाऊस पडत होता. वादळामुळे घरे, गुरांच्या गोठ्यांवरील पत्रे उडाली. तर पावसामुळे शेतांमध्ये असलेल्या जनावरांच्या कडब्याचे नुकसान झाले. सावखेडा गावात वादळाचा जोर अधिक होता. याठिकाणी वादळामुळे विजेचे पोल देखील कोसळले. विजेच्या तारा तुटल्याने वीजप्रवाह खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.

केळीला वादळाचा फटका-

या मॉन्सूनपूर्व पावसाचा सर्वाधिक फटका केळी बागांना बसला आहे. सावखेडा, खिरोदा शिवारातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील केळी बागा आडव्या झाल्या आहेत. त्यातील अनेक बागांमधील केळी निसवणीवर आलेली होती. मात्र, वादळामुळे घड तुटले, केळीचे खोड अर्ध्यातून मोडले. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावला आहे.Conclusion:शुक्रवारी पंचनामे होणार-

रावेर तालुक्यात ठिकठिकाणी वादळासह अवकाळी पाऊस झाल्याची माहिती मिळाल्याने रावेरच्या तहसीलदार देवगुणे यांनी सावखेडा, खिरोदा येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाच्या वतीने शुक्रवारी करण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी तहसीलदार देवगुणे यांनी दिली.
Last Updated : May 31, 2019, 9:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.