ETV Bharat / state

शिवजयंतीला मिरवणूक काढणे भोवले; भाजप आमदार मंगेश चव्हाणांसह दीडशे जणांवर गुन्हा

author img

By

Published : Feb 20, 2021, 5:48 PM IST

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह दिडशे जणांवर आज शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले.

fir on BJP MLA Mangesh Chavan
भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

जळगाव - चाळीसगाव कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने शंभर जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याचे निर्देशन दिलेले असताना दिडशे जणांवर सोबत घेऊन मिरवणुक काढली म्हणून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह दिडशे जणांवर आज शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय-

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पाश्वभूमीवर शिवजयंती शंभर जणांच्या उपस्थितीत साजरी करण्याचे निर्देशन जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. मात्र, शिवजयंतीच्या दिवशी दि. १९ फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहरातील रेल्वे स्थानक चौक ते सिग्नल चौक दरम्यान आमदार मंगेश चव्हाण सह दिडशेच्या वर कार्यकर्त्यांनी मिरवणुक काढली होती.

शहर पोलिसात गुन्हा दाखल-

नियमांची पायमल्ली केल्यामुळे आमदार मंगेश चव्हाण सह सौरभ अशोक पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक चिरागुद्धीन शेख, दिपक सिंग ईश्वरसिंग राजपूत, बबन पवार, कैलास पाटील, नगरसेवक नितीन रमेश पाटील, कल्पेश पाटील, करण राजपूत, अनिकेत गवळी, भागवत बाळु पाटील, पंकज पाटील, प्रमोद वाघ, दर्शन शिंदे, शुभम पाटील, कुणाल पाटील, योगेश कुमावत व इतर शंभर ते दीडशे अज्ञातांवर आज शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शहर पोलिस पंढरीनाथ दशरथ पवार ब.नं. २८७९ यांनी फिर्याद दाखल केली आहे. शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास स.पो.नि. किरण दांडगे करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.