ETV Bharat / state

बहुजन समाजाच्या नेत्यांचा भाजपकडून फक्त वापर; माजी आमदार शिरीष चौधरींचे टीकास्त्र

author img

By

Published : Aug 8, 2019, 6:24 AM IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा मतदारसंघात १० ऑगस्टपासून जनसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी रावेरातील माजी सैनिक सभागृहात बुधवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपकडून बहुजन समाजाच्या नेत्यांचा फक्त वापर होत असल्याचा आरोप केला.

माजी आमदार शिरीष चौधरी

जळगाव- जेव्हा उपयुक्तता होती तेव्हा भाजपने बहुजन समाजातील नेत्यांना डोक्यावर उचलले. मात्र, त्यांची उपयुक्तता संपली तेव्हा पद्धतशीरपणे त्यांना बाजूलाही केले. माजी मंत्री एकनाथ खडसेंचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. हाच भाजपचा खरा चेहरा आहे, अशा शब्दात रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

जनसंवाद यात्रेबाबत माहिती देताना रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा मतदारसंघात १० ऑगस्टपासून जनसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी रावेरातील माजी सैनिक सभागृहात बुधवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. चौधरी पुढे म्हणाले की, माजीमंत्री एकनाथ खडसे हे बहुजन समाजाचे नेते आहेत. त्यांनी ४० वर्षे पक्ष हितासाठी झोकून देऊन काम केले. परंतु त्यांची उपयुक्तता संपताच भाजपने त्यांना खड्ड्यासारखे बाजूला केले. आता खडसे नंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा क्रमांक आहे.

फसलेली नोटबंदी, आततायीपणे जीएसटी लागू करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. मात्र मोदी सरकार या विषयांवर बोलायला तयार नाही. देश हिताच्या मुद्द्यांना बगल देऊन नको त्या मुद्द्यांना प्राधान्य दिले जात आहे. आता भाजपच्या जुमलेबाजीला बळी न पडता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन देखील चौधरींनी केले.

ईव्हीएममुळेच भाजपचा विजय

एकीकडे देशभरातील जनता भाजपच्या हुकूमशाही पद्धतीच्या कारभाराला कंटाळली आहे. वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे जनता पोळून निघाली आहे. मात्र, तरीही भाजप प्रत्येक निवडणुकीत घवघवीत यश मिळवत आहे. हे मनाला न पटणारे आहे. जनमत विरोधात असताना भाजप केवळ ईव्हीएममध्ये छेडछाड करून विजय मिळवत असल्याचा आरोप देखील चौधरी यांनी केला.

Intro:जळगाव
जेव्हा उपयुक्तता होती तेव्हा भाजपने बहुजन समाजातील नेत्यांना डोक्यावर उचलले. मात्र, त्यांची उपयुक्तता संपली तेव्हा पद्धतशीरपणे बाजूलाही केले. माजीमंत्री एकनाथ खडसेंचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. हाच भाजपचा खरा चेहरा आहे, अशा शब्दांत रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.Body:काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा मतदारसंघात १० ऑगस्टपासून जनसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी रावेरातील माजी सैनिक सभागृहात बुधवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. चौधरी पुढे म्हणाले की माजीमंत्री एकनाथ खडसे हे बहुजन समाजाचे नेते आहेत. त्यांनी ४० वर्षे पक्षहितासाठी झोकून देऊन काम केले. परंतु, त्यांची उपयुक्तता संपताच भाजपने त्यांना खड्यासारखे बाजूला केले. आता खडसेंच्या नंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा क्रमांक आहे, असा दावा त्यांनी केला. फसलेली नोटबंदी, आततायीपणे घेतलेला जीएसटी लागू करण्याचा निर्णय यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. मात्र, मोदी सरकार या विषयांवर बोलायला तयार नाही. देशहिताच्या मुद्द्यांना बगल देऊन नको त्या मुद्द्यांना प्राधान्य दिले जात आहे. आता भाजपच्या जुमलेबाजीला बळी न पडता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन देखील चौधरींनी केले.Conclusion:ईव्हीएममुळेच भाजपचा विजय-

एकीकडे देशभरातील जनता भाजपच्या हुकूमशाही पद्धतीच्या कारभाराला कंटाळली आहे. वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे जनता पोळून निघाली आहे. मात्र, तरीही भाजप प्रत्येक निवडणुकीत घवघवीत यश मिळवत आहे. हे मनाला न पटणारे आहे. जनमत विरोधात असताना भाजप केवळ ईव्हीएममध्ये छेडछाड करून विजय मिळवत आहे, असा आरोप देखील यावेळी करण्यात आला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.