ETV Bharat / state

आज मी का मरत आहे ? महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राने खळबळ

author img

By

Published : Feb 14, 2020, 8:39 AM IST

Updated : Feb 14, 2020, 2:25 PM IST

हिंगोली जिल्ह्यात एका विवाहितेने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. या पत्रात तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार तिने मांडला आहे. या प्रकणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

woman-suicide-committed-by-physical-abuse-of-a-woman-in-hingoli
आज मी का मरत आहे? सोसाईड नोट ने उडालीय खळबळ

हिंगोली - हिंगणघाट येथील घटनेने संपूर्ण राज्यात वादंग उठले आहे. काही केल्या महिलांवरील अत्याचार कमी होत नाही आहेत. गुरुवारी हिंगोली जिल्ह्यातील एका गावात आत्महत्या करण्यापूर्वी एका विवाहितेने लिहून ठेवलेल्या पत्राने अक्षरशः खळबळ उडालीय. यात तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार तिने मांडलाय. तिच्यावर करण्यात आलेला अतिप्रसंग हा अंगावर शहारे उभे करणारा आहे. एवढेच नव्हे तर ज्या न्यायालयाकडे मोठ्या आशेने बघितले जाते तिथे देखील महिलेवर अत्याचार केल्याचे तिने सांगितले. त्या ठिकाणी पीडित महिलेलाच माफी मागायला लावली. या प्रकरणी पीडितेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रभान गणपत कायंदे, परमेश्वर नारायण वावरे, सुरेश नामदेव कायंदे अशी आरोपीची नावे आहेत.

आज मी का मरत आहे? आत्महत्येपूर्वीच्या महिलेच्या पत्राने खळबळ

आरोपीने 22 डिसेंबर 2015ला पीडितेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून पीडिता दोन महिन्याची गर्भवती असतानाही चंद्रभान कायंदे, परमेश्वर वावरे याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. सुरेश कायंदे याने बलात्काराचा व्हिडिओ काढला होता. अन धमक्या देऊन, सुरेश कायंदे यास फोनवर बोलण्यास लावले व त्याच्या सोबत अनैतिक संबध ठेवण्यास प्रवृत्त केले. मात्र, पीडिता ही दोन महिन्याची गरोदर असल्याने, तिने पती टाकून देईल या भीती पोटी घरात कुणाला काही सांगितले नाही. आरोपी हे पीडितेच्या व्हिडीओ गावात दाखवत होते. त्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, अन त्याना सजा मिळावी म्हणून पीडितेने न्यायालयात देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या त्या सुदैवाने बचावल्या. या प्रकरणात न्यायाधीशांनी पीडितेलाच माफी मागायला लावली होती. अन दुसरीकडे आरोपीने गावात बोंबाबोंब केली. याचा मनावर आघात झाला अन मी स्वतः फाशी घेऊन जीवन संपवित असल्याचे तीने सांगितले. त्यामुळे त्या तिघांना सजा व्हावी जेणेक असा कोणी गुन्हा करणार नसल्याचे पीडितेने आत्महत्येपूर्वी पत्रामध्ये लिहिले आहे. यातील काही उल्लेख तर खरोखरच अंगावर शहारे उभे करणारा आहे. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर हे करत आहेत.

शेतातच केले शवविच्छेदन -

हिंगोलीच्या आरोग्य विभागाला एवढे ग्रहण लागले आहे. पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी साखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागाच उपलब्द नसल्याने, पीडितेच्या शेतातच उघड्यावर शवविच्छेदन करण्याची दुर्दैवी वेळ आली. सरकारी रुग्णालयात उपचार घेताना तर औषधी नसतातच त्यामुळे जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागतातच. मात्र, मृत्यूनंतरही यातना कमी होत नसल्याचे विदारक चित्र या घटनेतुन समोर आले आहे.

Last Updated : Feb 14, 2020, 2:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.