ETV Bharat / state

एकाच वेळी नऊ सरकारी विभागांचा पदभार सांभाळणारी धाडसी दुर्गा

author img

By

Published : Oct 22, 2020, 10:59 AM IST

ज्योती पवार मागील अनेक वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांच्या कामामुळे सामान्य रुग्णालयातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात त्या प्रसिद्ध आहेत. एवढेच नव्हे तर कोणत्याही गावातून रात्री-अपरात्री रुग्ण आला तर पवार यांना हक्काने हाक मारली जाते.

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय
एकाच वेळी नऊ सरकारी विभागांचा पदभार सांभाळणारी धाडसी दुर्गा

हिंगोली - जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असणारी अधिपरिचारिका फक्त एकच नव्हे, तर विविध नऊ विभागांचा पदभार सांभाळून कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावत आहे. महामारी सुरू झाल्यापासून त्यांच्यावर ही जबाबदारी असून त्यांनी हे आव्हान समर्थ पणे पेललंय. दुर्गा महोत्सवानिमित्त 'ईटीव्ही भारत'ने हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयातून घेतलेला विशेष आढावा.

एकाच वेळी नऊ सरकारी विभागांचा पदभार सांभाळणारी धाडसी दुर्गा
ज्योती पवार मागील अनेक वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांच्या कामामुळे सामान्य रुग्णालयातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात त्या प्रसिद्ध आहेत. एवढेच नव्हे तर कोणत्याही गावातून रात्री-अपरात्री रुग्ण आला, तर पवार यांना हक्काने हाक मारली जाते. चोविस तास कार्यरत परिचारिका म्हणून त्यांची ओळख आहे. हाच विश्वास पाहून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये ओपीडी, फॅमिली प्लॅनिंग, सोनोग्राफी विभाग, ऑफिस, आयसोल्युशन वॉर्ड, ऑनलाइन रिपोर्टिंग, रिपोर्ट विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्ड यांसह हिंगोली औंढा नागनाथ रस्त्यावर नव्याने उभारण्यात आलेले कोरोना रुग्णालय, अशा एकूण 9 विभागांचा पदभार त्या सांभाळत आहेत.

हिंगोलीत पहिला कोरोनाबाधित रुग्ण आल्यानंतर त्याचा ईसीजी करण्याची संपूर्ण जबाबदारी ज्योती पवार यांनी स्वतः घेतल्याचे त्यांनी सांगितले. या धाडसामुळे आजवर अनेक रुग्णांनी त्यांचे आभार मानले आहेत.

तर राज्यराखीव दलातील जवानांवर उपचार केल्याने त्यांचा 'समदेशक मंचक इप्पर' यांनी पारितोषिक देऊन त्यांचा गौरविले आहे. तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या स्टाफचा देखील सत्कार झाला आहे.

घाबरू नका आम्ही तुमच्याच सेवेसाठी तत्पर

सध्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शक्यतो बाहेर अजिबात पडू नका आणि जर पडले तर स्वतःची काळजी घ्या तोंडाला मास्क बांधा, असे पवार म्हणाल्या. सॅनिटायझरचा देखील वापर कऱण्याचे त्यांनी सुचवले. कोरोनाची लागण झाल्यास घाबरू नका, आम्ही तुमच्या सेवेसाठी कायम रुग्णालयांमध्ये तत्पर असल्याचे अधिपरिचारिका त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.