ETV Bharat / state

हिंगोली ग्रामीण पोलिसांचाच महिला पोलीस कर्मचाऱ्याला मानसिक त्रास, महिलेवर उपचार सुरू

author img

By

Published : Jul 4, 2020, 5:00 PM IST

पोलिसच एका महिला पोलिसाला मानसिक त्रास देत असल्याची घटना हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात घडली आहे. त्रास असह्य झाल्याने महिला पोलीस कर्मचारी भोवळ येऊन पडल्या. त्यांच्यावर हिंगोलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे

हिंगोली - एकिकडे कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीत आपले जीव धोक्यात घालून पोलीस प्रशासन कर्तव्य पार पाडत आहे. मात्र, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात चालक व हजेरी मेजरने एका महिला कर्मचाऱ्यास मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. हा त्रास असह्य होत असल्याने, महिलेने वरिष्ठांकडे तक्रारीही केल्या. मात्र, काही उपयोग झाला नाही. त्रास वाढल्याने महिलेला पोलीस ठाण्यात चक्कर आली. त्यामुळे ती महिलेला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. वरिष्ठ मात्र या संदर्भात काही ही बोलत नाहीत.

आहिल्या आगंद मुंडे (ब.नं.758) असे कर्मचारी महिला पोलीसाचे नाव आहे. मुंडे ह्या हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे महिला पोलीस नाईक या पदावर कार्यरत असून, जनरल ड्युटी करतात. ठाण्यातच कार्यरत असलेले चालक जावेद शेख व हजेरी मेजर मोहम्मद शेख हे मुंडे ग्रामीण पोलीस ठाण्यात बदलून आल्यापासून मुंडे यांना मानसिक त्रास देत आहेत, असे तमुंडेंनी सांगितले. चालक जावेद शेख हे येता-जाता या महिलेला बघून शिट्टी वाजविणे, तसेच हिंदी गाणे लावत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत चालल्याने मुंडे यांनी वरिष्ठांकडे लिखीत तक्रार केली. त्यानंतर काही दिवस प्रकार थांबला अन पुन्हा सुरू झाला.

यापूर्वी ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी चालक जावेद याला समजावून सांगितले होते. काही दिवस शांत बसला अन त्याने परत तेच करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर चालक जावेदने मेजरला सांगून महिला कर्मचारी मुंडे यांची ड्युटी ही सतत अडीअडचणीच्या ठिकाणी लावत गेला. अनेकदा अडचण सांगून ही काही उपयोग झाला नसून एक वेळ अडचण सांगितली असता तुला ड्युटी ठिकाणी नेऊन सोडू का? असा शब्द प्रयोग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चालकाचे वाईट बोलणे हे लक्षात आल्याने हा प्रकार मुंडे यांनी पतीला सांगितला.

मुंडे यांच्या पतीने समजूत काढत पुढे असे काही झाले तर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करू असे म्हटले. मात्र, हा प्रकार काही केल्या कमी न झाल्याने महिलेला जास्तच मानसिक त्रास झाला. महिलेला पोलीस ठाण्यात चक्कर आली. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, ग्रामीण पोलीस ठाण्यात असे काही घडलेच नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता वरिष्ठ यामध्ये काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनाच या ठिकाणी सन्मान होत नसेल तर याठिकाणी तक्रार दाखल करण्यासाठी येणाऱ्या महिलांना कितपत सन्मान मिळत असेल, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा - पर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर बंधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.