ETV Bharat / state

सातच्या आत घरात! हिंगोली जिल्ह्यात नाईट कर्फ्यूचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

author img

By

Published : Feb 24, 2021, 12:39 PM IST

जिल्हाधिकारी जयवंशी यांनी जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. ही संचारबंदी रात्री सात ते सकाळी सात या कालावधीत राहणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. शिवाय संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवेची परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्याच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.

night curfew imposed
नाईट कर्फ्यूचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

हिंगोली- जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने आता शतक पार केले आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्याते रात्री 7 ते सकाळी सातपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे आता सातच्या आत घरात राहणे नागरिकांना बंधनकारक असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला दंड ठोठावण्यात येणार आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे आता काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये प्रतिदिन १४० च्या आसपास कोरोना रुग्ण बाधित होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आता चांगलेच सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी जयवंशी यांनी जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. ही संचारबंदी रात्री सात ते सकाळी सात या कालावधीत राहणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. शिवाय संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवेची परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने वा बाजार मध्ये किंवा गल्लीमध्ये गावांमध्ये घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्याच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.


असे आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश-

  • संचारबंदी कालावधीत दूध विक्री केंद्र, दूध विक्रेते रात्री ९ वाजेपर्यंत मुभा
  • संचारबंदी कालावधीत जिल्ह्यातील सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच बँका सुरू राहणार
  • शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी मुभा; ओळखपत्र असणे बंधनकारक
  • जिल्ह्यातील पेट्रोल पंप केवळ शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व कृषी सेवा संबंधित वाहनांसाठी संचारबंदी काळात खुली ठेवण्यास मुभा
  • खाजगी रुग्णालयात संलग्न असलेली औषधे दुकाने रुग्णालयाच्या वेळेनुसार सुरू राहतील
  • आपत्कालीन परिस्थितीत आवश्यकतेनुसार औषध दुकानांना चालू ठेवण्यास परवानगी आहे
  • पत्रकार व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी यांना वार्तांकन व कार्यालयीन कामकाजासाठी ये-जा करण्यास मुभा, ओळखपत्र बंधनकारक


सध्या जिल्ह्यातील विविध भागात राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाची कामे व दुरुस्तीची कामे सुरू असून, आरोग्य शासकीय विभागांशी संबंधित बांधकामे महावितरण, महापारेषण आणि इतर विद्युत विषयी विभागाकडील देखभाल व दुरुस्तीची कामे दूर संचार अशी संलग्न सेवा, पाणीपुरवठा निसार आणि स्वच्छते विषयक कामे करण्यास मुभा आहे. मात्र संबंधित विभागातील काम करणाऱ्याकडे आदेश आणि ओळखपत्र असणे बांधनकारक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.