ETV Bharat / state

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ छोट्या पक्षांना धक्का, हिंगोलीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे अनेक नेते भाजपत

author img

By

Published : Aug 24, 2019, 9:53 AM IST

कावरखे हे मुटकुळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत निष्क्रिय आमदार म्हणून टीका करत होते. मात्र, त्यांनी भाजपची कास धरल्यामुळे जिल्ह्यात याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हिंगोलीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे अनेक नेते भाजपत

हिंगोली - प्रहार जनशक्ती पक्षाचे सेनगाव तालुका प्रमुख गजानन कावरखे यांनी शुक्रवारी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजप आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठोपाठ छोट्या पक्षातील नेत्यांनाही आपल्याकडे वळवत असल्याचे समोर आले आहे.

हिंगोलीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे अनेक नेते भाजपत दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात भाजपमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातून बड्या नेत्यांची इनकमिंग सुरू असताना भाजपने आता लहान पक्षांचे पदाधिकारी देखील गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. त्याचा प्रत्यय शुक्रवारी सेनेगावमध्ये आला. हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपली आमदारकीची ५ वर्षे पूर्ण केल्यामुळे विकास कामाचा पाढा वाचण्यासाठी सेनगाव येथे कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख गजानन कावरखे यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते व कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.

कावरखे हे मुटकुळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत निष्क्रिय आमदार म्हणून टीका करत होते. मात्र, त्यांनी भाजपची कास धरल्यामुळे जिल्ह्यात याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कावरखे भाजपवासी झाले असले तरी ते विधानसभेच्या तोंडावर आमदारांप्रती निष्ठा राखणार का? की 'येरे माझ्या मागल्या' या उक्ती प्रमाणे कृती करणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, तरीही कावरखे यांच्या आणि इतर अनेक नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे मुटकुळे यांना या भागात पोषक वातावरण आहे. त्यामुळे मुटकुळे यांच्यासाठी परत अच्छे दिन येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुटकुळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास प्रदेश वक्ते रमेश हाके, माजी खासदार शिवाजी माने, दिनकर देशमुख, रामरतन शिंदे आणि अशोक ठेंगल उपस्थित होते. यावेळी मुटकुळे यांनी त्यांच्या ५ वर्षांच्या काळात करण्यात आलेल्या कामांचा लेखा जोखा वाचला.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांची यादी

गजानन प्रकाश कावरखे, गजानन गीरे (गाव सर्कल प्रमुख), दत्तराव साळुंके, उमेश कावरखे, गजानन कावरखे, आलम पठाण, निलेश धामनकर, नितीन कावरखे अशा १०० कार्यक्रत्यांनी प्रवेश केला.

Intro:

अन हे आहेत भाजपवाशी पक्षाचे पदाधिकारी

हिंगोली- एकेकाळी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील सेनगाव हा काँग्रेसचा गड मानला जात होता. सलग पंधरा वर्षीय हिंगोली विधानसभेचे नेतृत्व करणाऱ्या माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांना या तालुक्यातून सर्वाधिक जास्त मताधिक्‍य मिळत होते. कालांतराने या तालुक्यात नेते तितकेच पक्ष अशी स्थिती पहावयास मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात भाजपमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातून बडया नेत्यांची इन्कमिंग सुरू असताना भाजपने आता लहान पक्षांचे पदाधिकारी देखील गळाला लावण्यास सुरुवात केलीय. चक्क इतर इतर पक्षात वावरणाऱ्याने आज भाजप मध्ये प्रवेश केलाय.

Body:हिंगोली चे आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपली आमदारकीची पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात अन विकास कामाचा पाढा वाचण्यासाठी सेनगाव येथे कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये प्रहार जणशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख गजानन कावरखे यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते व कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे कालपर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत निष्क्रिय आमदार म्हणून लाखोली वाहणार्‍या प्रहारच्या तालुका प्रमुखाने आता भाजपची कास धरलीय. त्यामुळे आता कवरखे संदर्भात जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता भाजप वाशी झालेले गजानन कावरखे हे विधानसभेच्या तोंडावर आमदारा प्रतीक निष्ठा राखणार का? ''येरे माझ्या मागल्या'' या उक्तीप्रमाणे कावरखे कृती करतील हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. कार्यक्रमास प्रदेश वक्ते रमेशदादा हाके, माजी खा. शिवाजी माने, दिनकर देशमुख, रामरतन शिंदे, अशोक ठेंगल आदींची उपस्थिती होती.दरम्यान, आ. तान्हाजी मुटकुळे यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या काळात करण्यात आलेल्या कामांचा लेखा जोखा वाचला. लेखा जोख्यातून विकासाचा आलेख वाढल्याचे दिसून आले.त्यामुळे आता मुटकुळे यांना या भागात पोषक वातावरण आहे. त्यामुळे मुटकुळे यांच्यासाठी परत अच्छे दिन येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही आहे यादी प्रवेश केलेल्यांचीConclusion:गजानन प्रकाश कावरखे,जिल्हा उपाध्यक्ष ,गजानन गीरे गाव सर्कल प्रमुख ,दत्तराव साळुंके,उमेश कावरखे,गजानन कावरखे,आलम पठाण,निलेश धामनकर,नितीन कावरखे अशा 100 कार्यक्रत्यांनी प्रवेश केलाय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.