ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस; शेतकरी चिंताग्रस्त

author img

By

Published : Mar 21, 2021, 1:43 PM IST

हिंगोली जिल्ह्यांमध्ये शेतकरी हळद व गहू काढणीला वेग आला आहे. परिणामी मजूरांना देखील रोजगार मिळत असल्यामुळे परराज्यातील मजूर हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

heavy-unseasonal-rain-in hingoli
हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस

हिंगोली- जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून वातावरणात बदल जाणवत आहे. तर रात्रीच्या वेळी अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत रविवारी पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. सध्या गहू हरभरा हळद काढणीला वेग आला आहे मात्र अवकाळी पावसाने चांगलीच दैना मांडली आहे.

अवकाळी पावसाचा पिकांवर परिणाम
अगोदरच कोरोना ने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपेनेला सामोरे जावे लागत आहे. सध्या रब्बी हंगाम हा हातातोंडाशी आलेला असून शेतकरी रात्रंदिवस एक करीत रब्बीचे पीक काढून घेण्यामध्ये मग्न आहेत. मात्र, तीन ते चार दिवसापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळेस पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतामध्ये कापून ठेवलेले पीक झाकून ठेवण्यासाठी एकच धांदल उडत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : मतदानाला सुरुवात; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

गहू व हळद काढणीला वेग
हिंगोली जिल्ह्यांमध्ये शेतकरी हळद व गहू काढणीला वेग आला आहे. परिणामी मजूरांना देखील रोजगार मिळत असल्यामुळे परराज्यातील मजूर हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

आरोग्यावरही परिणाम
थंड गरम वातावरण असल्याने, याचा परिणाम आरोग्यावरही होत आहे. वयोवृद्ध व बालकांना त्रास जाणवत आहे. त्यातच गावोगावी राबवण्यात येत असलेल्या अ‍ॅन्टीजन चाचणीत बरेच कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे.

हेही वाचा- कोरोनाचा हॉटस्पॉट ! मालेगावातील चित्रपटगृहात प्रेक्षकांची तुफान गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.