ETV Bharat / state

हिंगोलीत जोरदार पाऊस; शेतकऱ्यांवर तिसऱ्यांदा पेरणीची वेळ

author img

By

Published : Jun 27, 2020, 12:16 PM IST

Updated : Jun 27, 2020, 8:00 PM IST

जिल्ह्यातील सेनगाव, ओंढा, कळमनुरी, हिंगोली तालुक्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले.

heavy-rain-lashes-in-hingoli
हिंगोलीत जोरदार पाऊस; शेतकऱ्यांवर तिसऱ्यांदा पेरणीची वेळ

हिंगोली - जिल्ह्यातील विविध भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अधून-मधून पडत आहे. गुरुवारी मात्र जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी होते. त्यामळे शेतांना शेत-तळ्याचे रूप आले आहे. या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर मात्र तिसऱ्यांदा खरिपाची पेरणी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

जिल्ह्यातील सेनगाव, ओंढा, कळमनुरी, हिंगोली तालुक्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. नुकताच शेतीकामांना वेग आला होता. काही शेतात पाणी साचल्याने तर काही बियाणे बोगस निघाल्याने बियाणे उगवलेच नाही. काही शेतातील बियाणे आणि गाळ या जोरदार पावसामुळे वाहून गेला आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वटकळी, कोंडवाडा, सिंनगी कोळसा या गावांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे या भागातील बंधाऱ्याना पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर औंढा नागनाथ तालुक्यातील नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. नदी काठच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने शेतातील जमीन पूर्णपणे खरडून गेली तर शेतात साचलेल्या पावसामुळे सोयाबीन सडून गेले आहे.

heavy-rain-lashes-in-hingoli
हिंगोलीत जोरदार पाऊस; शेतकऱ्यांवर तिसऱ्यांदा पेरणीची वेळ

तिसऱ्यांदा पेरणीची वेळ आल्याने शेतकरी मदतीची मागणी करीत आहेत. एकंदरीत जिल्ह्यात २८.३० मिलीमीटर मीटर पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. सेनगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. प्रशासन स्तरावर नुकसानीचा पंचनामा करण्यात आला नसल्याचे या भागातील शेतकरी सांगत आहेत.

हिंगोलीत जोरदार पाऊस; शेतकऱ्यांवर तिसऱ्यांदा पेरणीची वेळ
Last Updated : Jun 27, 2020, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.