ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस, खरीप पेरणीला सुरुवात

author img

By

Published : Jun 12, 2020, 7:46 PM IST

Updated : Jun 13, 2020, 12:23 AM IST

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, जिल्ह्यात सलग 3 दिवसांपासून अधूनमधून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे, शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

Heavy rain in hingoli district, farmers happy with rain
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस, खरीप पेरणीला सुरुवात

हिंगोली - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, जिल्ह्यात सलग 3 दिवसांपासून अधूनमधून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे, शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची पेरणीसाठी पावसाची असलेली प्रतीक्षा संपलेली आहे. मात्र, वापसा झालेल्या शेत शिवारात शेतकरी पेरणी करण्यात मग्न झाले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस, खरीप पेरणीला सुरुवात
हिंगोली कृषी विभागाच्यावतीने पेरणीयोग्य पाऊस होईपर्यंत पेरण्या न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यात सलग तीन दिवसापासून पाऊस जोरदार हजेरी लावत असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. तर अनेक क्षेत्रात शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आता शेतकऱ्यांची जोरदार पावसाची प्रतीक्षा ही पूर्णपणे संपली आहे. शेतात साचलेल्या पाण्याचा वापसा होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. मात्र, जिल्ह्यातील माळरानाला भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली आहे. यावर्षी मान्सून योग्यवेळी दाखल झाल्याने बळीराजा सुखावला असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी वेळेत हजेरी लावलेल्या पावसामुळे मूग उडीद बियाणाची पेरणी कमी प्रमाणात झाली होती. मात्र, यंदा वेळेतच मान्सून दाखल झाल्याचा फायदा मूग, उडीद पेरणीसाठी उपयोगी ठरणार आहे.

पेरणी वेळेत आटोपण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरचा सहारा घेत आहेत. एकंदरीत हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र हे पेरणीयोग्य असून, दोन लाख हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी केली जाते. उर्वरित हेक्‍टरवर कापूस, मूग, उडीद हळद याची लागवड केली जाते. मात्र, यावर्षी योग्य वेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे, सोयाबीनच्या पेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. आता मात्र शेतकरी कृषी केंद्रावर खते बी-बियाणे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

Last Updated : Jun 13, 2020, 12:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.