ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्याला पावसाने दीड तास झोडपले; सेनगाव तालुक्यातील पिके जमीनदोस्त

author img

By

Published : Oct 23, 2020, 8:03 AM IST

हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला. परतीच्या या पावसाने सेनगाव तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

पावसाने दीड तास झोडपले
पावसाने दीड तास झोडपले

हिंगोली- दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी पुन्हा एकादा जिल्ह्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. सेनगाव तालुक्यात मात्र मुसळधार पाऊस बरसला. यामुळे या भागातील पिके जमीनदोस्त झाली आहेत. तसेच वादळी वाऱ्यामुळे घरावरील टिनपत्रे ही उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत आहेत. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झालेली नसली तरी शेतीचे मात्र अतोनात नुकसान झाले आहे. या पावसाने तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सेनगाव तालुक्यातील पिके जमिनोदोस्त
सेनगाव तालुक्यातील पिके जमिनोदोस्त
सेनगाव परिसरात गुरुवारी तब्बल दीड तास पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने जागोजागी विजेचे खांब पडले आहेत. या वादळी वारे आणि पावसामुळे भंडारी या गावातील 20 ते 21 घरावरील टिनपत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या सर्वच कुटुंबाचे संसार पाण्यात भिजले. तसेच संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहाणी झाली नाही.

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्यात आहेत. ते पाणी आटण्यापूर्वीच पुन्हा पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी पुरता मोडकळीस आला आहे. सध्या शेतकरी हे दुर्गा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात झेंडूची फुले नेण्यासाठी रात्रंदिवस एक करीत आहेत. मात्र पावसाने फुले देखील झोडपून काढली आहेत. तर बरेच शेतकरी हे सोयाबीनच्या गंज्या झाकून ठेवण्यासाठी पळत सुटल्याचेही दिसून आले. तर तूर पिकाचीही नुकसानी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनामे करून मदतीची मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.