ETV Bharat / state

हिंगोलीत विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोनाचाचणी

author img

By

Published : Apr 16, 2021, 8:18 PM IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोलीत विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. यात 98 लोकांच्या कोरोना चाचणीत 8 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हिंगोलीचे प्रशासन आता सक्रिय झाले आहे. विनाकारण रस्त्यावर न फिरण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी
विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी

हिंगोली - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात संचारबंदी लागू केलेली आहे. विनाकारण न फिरण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करून देखील, बरेच लोक त्याचे पालन करीत नसल्याचे समोर आले आहे. यावर जालीम उपाय म्हणून, विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच रॅपिड चाचणी केली जात आहे. दुपारपर्यन्त 98 लोकांची चाचणी केली असता, त्यापैकी 8 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना कोरोना केअर सेंटरला पाठवले आहे. या प्रकाराने मात्र विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. तर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी देखील रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला.

हिंगोलीत विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी हिंगोली जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना बाधित रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत आहे. आजघडीला जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्याही दहा हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. तर १ हजार 200 च्या वर कोरोना बाधित रुग्णावर विविध कोरोना वार्डात उपचार सुरू आहेत. मात्र वाढत्या रुग्ण संख्येने आरोग्य यंत्रणा व प्रशासन पूर्णपणे गोंधळून गेले आहे. रुग्णावर उपचार करण्यासाठी यंत्रणेची धावपळ उडाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकरी रुचेश जयवंशी यांनी कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वय साधून एकत्र काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस विभाग, आरोग्य विभाग, पंचायत विभाग, नगर पालिका प्रशासन विभागाने नियोजन केले आहे. सर्वच विभागाचे कर्मचारी हे रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्याद्वारे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. प्रत्येक वाहनांची करण्यात तपासणीहिंगोली शहरात सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, सरदारसिंह ठाकूर, पोनी पंडित कच्छवे, वाहतूक शाखेचे पोनी श्रीमनवार यांच्या पथकाने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली आहे. जवळपास 98 लोकांच्या तपासणीत 8 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात पायी फिरणारे, चार चाकी वाहनांमधून फिरणाऱ्यांची ही चाचणी केली आहे.विना मास्क फिरणाऱ्यावर दांडात्मक कारवाईहिंगोली शहरांमध्ये एवढा कडक बंदोबस्त असून, त्यामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. मात्र विनामास्क फिरणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. एकंदरीतच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हिंगोलीचे प्रशासन आता सक्रिय झाले आहे. विनाकारण रस्त्यावर न फिरण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा - भाजपा आमदार प्रशांत बंब यांचा पोलिसांसोबत वाद, व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.