ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, खरीप पिकांचे नुकसान

author img

By

Published : Jul 15, 2020, 7:36 PM IST

हिंगोली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने, शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. तर नदी नाल्या लागत असलेल्या जमिनीत तर फार वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज घडीला पिकांच्या वर पावसाचे पाणी साचलेले असल्याने, सोयाबीन पिवळी पडत आहे.

हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

हिंगोली - जिल्ह्यामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून संततधार सुरू आहे. आजही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर तिसऱ्यांदा नव्हे तर चौथ्यांदा लावणी करण्याची वेळ येऊन ठेपली असून तरीदेखील उगवण झालेली नाही. तर, आजच्या मुसळधार पाऊस झाल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत.

हिंगोली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने, शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. तर नदी नाल्या लागत असलेल्या जमिनीत तर फार वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज घडीला पिकांच्या वर पावसाचे पाणी साचलेले असल्याने, सोयाबीन पिवळी पडत आहे. एवढेच नव्हे तर सध्या सोयाबीनची वाढ झालेली असली तरीही शेतामध्ये फवारणी करण्या इतपत देखील पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकरी फवारणी करत आहेत मात्र, त्याचा पिकासाठी काही उपयोग होत नाही जैसे थे परिस्थिती निर्माण होत असल्याने आजघडीला सोयाबीनच्या पिकात मोठ्या प्रमाणात तण देखील वाढले आहे. त्यामुळे शेतकरी आता अडचणीत सापडला आहे. अगोदरच कोरोनाने हवालदिल झालेला शेतकरी, या पावसाने चांगलाच गोंधळून गेला आहे.

सारखा पाऊस सुरू असल्याने शेतीची देखील कामे करता येत नाहीयेत. आता शेतकऱ्यांची भिस्त आहे ती केवळ सरकारी यंत्रणेवर संबंधित विभागांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावे व शासनस्तरावर तेवढी मदत करावी एवढीच अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.