ETV Bharat / state

आता गोंदियातच होणार स्वॅबची चाचणी; आयसीएमआरची मंजुरी

author img

By

Published : Jun 8, 2020, 7:43 PM IST

मागील तीन महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादूर्भाव आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. गोंदिया येथे शासकीय महाविद्यालय आहे. मात्र या ठिकाणी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीची सुविधा नव्हती.

gondia
आता गोंदियातच होणार स्वॅबची चाचणी

गोंदिया - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. यासाठी लागणारी यंत्रसामुग्रीसुद्धा सिंगापुरहून दाखल झाली आहे. यात स्वॅब नमुन्यांची ट्रायल चाचणी यशस्वी झाली आहे. याला एम्स आणि आयसीएमआरने आयडी आणि पासवर्ड रविवारी उपलब्ध करून दिले असून, सोमवारपासून गोंदिया येथेच स्वॅब नमुन्यांची चाचणी होणार आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही चांगली बातमी आहे.

डॉ. दिलीप गेडाम

मागील तीन महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादूर्भाव आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. गोंदिया येथे शासकीय महाविद्यालय आहे. मात्र या ठिकाणी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीची सुविधा नव्हती. त्यामुळे येथील स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील एम्स आणि मेयोच्या प्रयोगशाळेत पाठवले जात होते. त्यामुळेच स्वॅब नुमन्याचा अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत होता. परिणामी रुग्णांवर त्वरीत उपचार करण्यास अडचण होत होती. शिवाय दररोज एका रुग्णवाहिकेने हे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठवावे लागत होते. त्यामुळे आर्थिक भुर्दंडसुद्धा बसत होता. हीच समस्या ओळखून शासनाने गोंदिया येथे स्वॅब नमुने प्रयोगशाळेला मंजुरी दिली. यानंतर यासाठी सिंगापुरहून आवश्यक यंत्रसामुग्री मागवण्यात आली.

gondia
आता गोंदियातच होणार स्वॅबची चाचणी

पंधरा दिवसांपूर्वी ही यंत्रसामुग्री दाखल झाली असून तज्ज्ञांकडून त्याचे इंन्स्ट्रॉलेशन सुद्धा पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर शुक्रवारी ५ मे रोजी या प्रयोगशाळेत स्वॅब नमुन्यांचा अहवाल नागपूर येथील एम्स आणि मेयोच्या प्रयोगशाळेतील अहवालाशी जुळतात का याची चाचपणी करण्यात आली. शनिवार ६ मे रोजी हे नमुने जुळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आयसीएमआरकडे ही सर्व माहिती पाठवण्यात आली. त्यानंतर आयसीएमआरने याला रविवारी ७ मे ला मंजुरी दिली असून, यासाठी लागणारे आवश्यक आयडी आणि पासवर्डसुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे येथील प्रयोगशाळेतील आजपासून नियमित स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे. परिणामी नागपूर स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्याची गरज राहणार नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीची प्रक्रिया आजपासून सुरू केली जाणार आहे. त्यामुळे आता नागपूर येथे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची गरज नसून त्वरीत अहवाल प्राप्त होणार असल्याने रुग्णावर त्वरीत उपचार करण्यास मदत होणार आहे. आज गोंदिया येथील दोन लोकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले असून त्यांचा अहवाल ४ तासांनंतर येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.