ETV Bharat / state

'या' तालुक्यात यंदा 'सार्वजनिक गणेश स्थापना' नाहीच, अनेक वर्षांच्या परंपरेला खंड

author img

By

Published : Aug 27, 2020, 8:01 PM IST

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तहसील येथे यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग, तहसील विभाग व सर्व गणपती मंडळ यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्या बैठकीत सर्व सार्वजनिक गणपती मंडळांनी कोरोनाचे संकट बघता एकही सार्वजनिक गणपती स्थापना न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील एकमेव तालुका
राज्यातील एकमेव तालुका

गोंदिया : जिल्हातील या ठिकाणी अनेक वर्षांपासून चालत आलेल्या गणेश स्थापनेच्या परंपरेला यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाने खंड पडला आहे. जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त असलेल्या सालेकसा तहसीलमध्ये यावर्षी एकही सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आलेली नाही. एकही सार्वजनिक गणपती स्थापना न करण्यात आलेला सालेकसा हा राज्यातील पहिलाच तालुका ठरला आहे.

कोरोनाचा फटका प्रत्येक सणावर बसला असून राज्याच्या सर्वात मोठ्या सार्वजनिक उत्सवावर यंदा मोठे विरजण पडले आहे. कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमीत केलेल्या आदेश लक्षात घेत यावर्षी ठिकठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात आले. सार्वजनिक गणेश स्थापनेसाठी काही अटी घालून पोलीस प्रशासनाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी असलेल्या मंडळांनाच अर्ज करण्याची अट घातली होती. गृहविभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे यंदा शक्यतो सार्वजनिक गणेशऐवजी घरीच साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तर, सार्वजनिक गणेशाची मुर्ती ४ फुटांपेक्षा जास्त उंच नसावी. अशा अटीप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापन करण्यात आली.

मात्र, गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तहसील येथे यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग, तहसील विभाग व सर्व गणपती मंडळ यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्या बैठकीत सर्व सार्वजनिक गणपती मंडळांनी कोरोनाचे संकट बघता एकही सार्वजनिक गणपती स्थापना करणार नाही, असे ठरवले. दरम्यान, या तालुक्यात मागील वर्षी ९२ सार्वजनिक गणेश मंडळाद्वारे गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. मात्र, यावर्षी एकही सार्वजनिक गणपती मंडळाने गणेश मूर्तीची स्थापना केलीली नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली सार्वजनिक गणपती स्थापनेच्या परंपराला यावर्षी खंड पडला आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.