ETV Bharat / state

गोंदियात कोरोनाबाधितांचे शतक, आज 15 नवीन रुग्णांची नोंद

author img

By

Published : Jun 16, 2020, 10:02 PM IST

गोंदिया येथील चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालातून तब्बल 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, गेल्या पाच दिवसात 32 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यात आता कोरोना अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 32 झाली आहे. तर, आज आढळलेल्या 15 रुग्णांमध्ये तिरोडा तालुक्यातील 13 रुग्ण आणि गोंदिया तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.

गोंदियात कोरोनाग्रस्तांचे शतक
गोंदियात कोरोनाग्रस्तांचे शतक

गोंदिया - जिल्ह्यात अलीकडे दररोज आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्यात आज(मंगळवार) नवीन 15 रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकूण बधितांची संख्या 101 झाली आहे. तर, जिल्ह्यात 32 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

सहा दिवसापूर्वी कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पर राज्यात रोजगारासाठी गेलेले लोक परत येत आहेत. या नागरिकांच्या चाचणी अहवालावरून ते कोरोनाबाधित असल्याचे दिसून येत आहे. आज गोंदिया येथील चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालातून तब्बल 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, गेल्या पाच दिवसात 32 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यात आता कोरोना अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 32 झाली आहे. तर, आज आढळलेल्या 15 रुग्णांमध्ये तिरोडा तालुक्यातील 13 रुग्ण आणि गोंदिया तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.

मागील पाच दिवसात आढळून आलेल्या बाधित व्यक्तींना पर राज्यातून जिल्ह्यात दाखल होताच संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले. त्यामुळे ते जिल्ह्यातील इतर नागरिकांच्या संपर्कात येऊ शकले नाही. हे रुग्ण दिल्ली येथून आलेले आहेत. त्यांचे स्वॅब नमुने घेतले असता त्यातील 15 जणांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. आज आढळून आलेले 15 रुग्ण हे 20 ते 50 वर्ष वयोगटातील आहे. पाच दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा कोरोनामुक्त झालेला गोंदिया जिल्हा परराज्यातून परतलेल्या मजुरांमुळे पुन्हा बाधित झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात 26 मार्चला पहिला बाधित रुग्ण, 19 मे रोजी 2 रुग्ण, 21 मे रोजी 27 रुग्ण, 22 मे रोजी 10 रुग्ण, 24 मे रोजी 4 रुग्ण, 25 मे रोजी 4 रुग्ण, 26 मे रोजी 1 रुग्ण, 27 मे रोजी 1 रुग्ण, 28 मे रोजी 9 रुग्ण, 29 मे रोजी 3 रुग्ण, 30 मे रोजी 4 रुग्ण, 31 मे रोजी 1 रुग्ण, 2 जून रोजी 2 रुग्ण, 12 जून रोजी 1 रुग्ण, 13 जून रोजी 1 रुग्ण, 14 जून रोजी 1 रुग्ण,15 जून रोजी 14 रुग्ण आणि आज 16 जून रोजी 15 असे एकूण 101 रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील 1 हजार 368 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये 101 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 39 नमुन्यांचा चाचणी अहवाल गोंदिया येथील विषाणू प्रयोगशाळेत प्रलंबित आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 69 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज नवीन 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्याचा आकडा 101 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात आता 32 अ‌ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 1 हजार 159 आणि घरी 1 हजार 677 असे एकूण 2 हजार 836 व्यक्ती अलगीकरणात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.