ETV Bharat / state

लॉकडाऊनचे नियम पाळण्यासाठी नगरसेवकाने लढवली 'ही' शक्कल

author img

By

Published : Apr 19, 2020, 5:50 PM IST

नगरसेवक संकल्प खोब्रागडे यांनी एक नामी शक्कल लढवत अनोखे फलक तयार करीत आपल्या वॉर्डातील प्रत्येक घराच्या गेट, दारावर, घरासमोर फलक लावत लोकांना या फलकाचे पालन करण्याची विनंती करत आहेत.

लॉकडाऊनचे नियम पाळण्यासाठी नगरसेवकाने लढवली 'ही' शक्कल

गोंदिया - कोरोनाला हरवायचे असेल तर घरीच राहा, घराबाहेर पडू नका व सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य आहे. गोंदिया शहराच्या कुंभरे नगरातील प्रभाग क्रमांक १७चे नगरसेवक संकल्प खोब्रागडे यांनी एक नामी शक्कल लढवत अनोखे फलक तयार करीत आपल्या वॉर्डातील प्रत्येक घराच्या गेट, दारावर, घरासमोर फलक लावत लोकांना या फलकाचे पालन करण्याची विनंती करत आहेत.

लॉकडाऊनचे नियम पाळण्यासाठी नगरसेवकाने लढवली 'ही' शक्कल

कृपया आत कुणी येऊ नये, आम्ही घरीच आहोत, तुम्हीही घरीच राहा, कृपया वाईट मानू नका, लॉकडाऊन संपल्यानंतर नकीच भेटू, भेटणे टाळा, नियम पाळा, गो कोरोना गो, असा सामाजिक संदेश त्यांनी त्या फलकावर दिला असून परिसरातील लोकही त्या फलकाचे पालन करीत आपल्या घरीच थांबत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्यातील प्रत्येक नागरिकाने या फलकाचे नियम पाळले तर गोंदिया शहरात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढणार नाही व या कोरोनाच्या लढाईला आपण घरी राहून जिंकू हे मात्र निश्चित आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.