ETV Bharat / state

गोंदियात एड्सग्रस्तांसाठी एआरटीचे कर्मचारी ठरले देवदूत

author img

By

Published : Jun 21, 2020, 5:59 PM IST

Updated : Jun 21, 2020, 6:27 PM IST

कोरोनाच्या कालावधीत गोंदियामध्ये विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांना आवश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर येण्यास बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत सर्वात मोठी समस्या एचआयव्हीग्रस्तांना भेडसावत होती. मात्र, त्यांच्या मदतीसाठी गोंदिया आरोग्य विभागाच्या एसआरटी (एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र) चे कर्मचारी पुढे आले आहेत.

ART staff provided medicanes to AIDS patients at home in gondia
गोंदियात एड्सग्रस्तांसाठी एआरटीचे कर्मचारी ठरले देवदूत


गोंदिया - कोरोनाच्या कालावधीत गोंदियामध्ये विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांना आवश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर येण्यास बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत सर्वात मोठी समस्या एचआयव्ही ग्रस्तांना भेडसावत होती. कारण त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यातच त्यांच्या प्रकृतीवर फरक पडू शकतो. परंतु, गोंदिया आरोग्य विभागाच्या एआरटी (एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र) चे कर्मचारी देवदूत म्हणून पुढे आले आहेत.

स्वयंसेवी संस्थांच्या समुपदेशकांच्या माध्यमातून ते पीडित व्यक्तींच्या घरी जाऊन औषधे आणि सल्ला देत त्यांचे संरक्षण करण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १ हजार ७३३ एचआयव्ही पीडित पूर्णपणे सुरक्षित आहेत. गोंदिया जिल्ह्यात कोरोनाला थांबविण्यासाठी लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळण्यात येत आहेत. वाहतूक व्यवस्था ही बंद असल्यामुळे एचआयव्हीग्रस्त रूग्णांना औषधे व सल्ला घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. जिल्ह्यात एकूण २ हजार ८१३ रूग्ण आहे. यातील काही रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर काही जिल्ह्याच्या बाहेर आहेत. यापैकी १ हजार ७३३ रूग्णांना लॉकडाउनच्या दरम्यान त्यांच्या घरी जाऊन सेवा दिली जात आहे.

गोंदियात एड्सग्रस्तांसाठी एआरटीचे कर्मचारी ठरले देवदूत

लॉकडाऊनदरम्यान पीडितांना कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होवू नये या उद्येशाने स्वास्थ विभागाच्या मार्गदर्शनाखाली पीडितांना त्यांच्या घरी जाऊन सेवा दिली जात आहे. यासाठी एनजीओच्या काउंसलराची मदत घेतली जात आहे. मार्च महिन्यात ७०, एप्रिल महिन्यात २९५, मे महिन्यात १०१ व जुनमध्ये १९ रूग्णांच्या घरी जाऊन सेवा देण्यात आली आहे. याप्रकारे १ हजार ७३३ पीडितांच्या घरी जाऊन औषधी दिली आहेत.

मार्च महिन्यात २, एप्रिल महिन्यात ५, मे मध्ये ५ अशाप्रकारे १२ नवीन रूग्ण एचआयव्ही पॉझिटीव्ह रुग्ण मिळाले आहेत. कोविड - १९ व लॉकडाउनमध्ये एचआयव्ही पीडित पुर्ण सुरक्षीत आहे. लॉकडाऊनच्यादरम्यान ३ महिन्यामध्ये नवीन एचआयव्ही पॉजिटीव्ह १२ रूग्ण मिळाले असुन जिल्ह्यात एकूण २ हजार ८१३ पिडीतांची नोंद आहे. त्यापैकी १ हजार ७३३ पीडितांवर उपचार सुरू आहेत.

Last Updated : Jun 21, 2020, 6:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.