ETV Bharat / state

गडचिरोलीत मुसळधार पाऊस; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

author img

By

Published : Sep 24, 2019, 10:49 PM IST

गडचिरोलीत मुसळधार पाऊस

मंगळवारी दिवसभर ऊन तापत असताना सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या मुसळधार पावसाने आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील असलेल्या एका छोट्या पुलावर पाणी चढले.

गडचिरोली - जिल्ह्यात मंगळवारी अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. सप्टेंबर महिना उलटत आला असतानाही अधून-मधून पाऊस सुरुच आहे. त्यामुळे या पावसाचा खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गडचिरोलीत मुसळधार पाऊस

हेही वाचा- महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या 'या' दिग्गज नेत्यांची भासणार उणीव

मंगळवारी दिवसभर ऊन तापत असताना सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या मुसळधार पावसाने आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील असलेल्या एका छोट्या पुलावर पाणी चढले. या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली होती. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कधी मुसळधार, तर कधी रिमझिम पावसाच्या सरी बरसतच असल्याने धान पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.

Intro:गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

गडचिरोली : जिल्ह्यात मंगळवारी अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. सप्टेंबर महिना उलटत आला असतानाही अधून-मधून पाऊस सुरूच असल्याने या पावसाचा खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.Body:मंगळवारी दिवसभर ऊन तापत असताना सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या मुसळधार पावसाने आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील असलेल्या एका छोट्या पुलावर पाणी चढले आणि या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कधी मुसळधार, तर कधी रिमझिम पावसाच्या सरी बरसतच असल्याने धान पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.