ETV Bharat / state

गोंडवाना विद्यापीठाने आदिवासी भागातून आत्मनिर्भर भारताची सुरुवात करावी - राज्यपाल

author img

By

Published : Jan 28, 2021, 8:42 PM IST

आत्मनिर्भर जीवन आदिवासी जगत असतात. त्यामुळे आत्मनिर्भर भारताची सुरूवात आदिवासी भागातून झाली पाहिजे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

गडचिरोली - आत्मनिर्भर जीवन आदिवासी जगत असतात. त्यामुळे आत्मनिर्भर भारताची सुरूवात आदिवासी भागातून झाली पाहिजे. या दृष्टीकोणातून गोंडवाना विद्यापीठाने गोंडवानाचा प्रदेश कशाप्रकारे आत्मनिर्भर बनवता येइल यादृष्टीने प्रयत्न करावे, जेणेकरून गोंडवाना विद्यापीठाचे विद्यार्थी नोकरीकरीता फिरणार नाहीत. तर ते आत्मनिर्भर होतील, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या आठव्या दिक्षांत समारंभ प्रसंगी केले.

विद्यापीठ विकासासाठी निधीची मागणी-

आदिवासी आणि वन विद्यापीठ म्हणून विशेष दर्जा मिळावा. पदव्युत्तर शिक्षण विभागासाठी, परिक्षा व प्रशासकिय विभागासाठी, इमारत बांधण्यासाठी निधी मंजुर करावा. स्थानिक आदिवासी कलाकार आणि लोकनाटय यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष सांस्कृतीक सभागृह मंजुर करावे, स्वतंत्र सहसंचालक कार्यालय मंजुर करावे तसेच मॉडेल कॉलेज बांधण्यासाठी विशेष निधी मंजुर करण्याबाबत मागण्यांचा आशय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, उदय सामंत, यांना उददेशुन कुलगुरू डॉ. वरखेडे यांनी यावेळी केले.

आदिवासी दृढ निश्चयी आणि मेहनती - डॉ. एस. सी. शर्मा

भारतातल्या विविध आदिवासी जमातीमध्ये गोंड सगळयात मोठे आदिवासी आहे. जे भारताच्या मध्य पर्वतीय भागामध्ये राहतात. ते दृढ निश्चय आणि मेहनती लोक आहे. आपण पाहतो की त्यांच्या जीवन मानामध्ये चालीरिती, पंरपरा, आणि संस्कृती यांचा परस्पर संबंध आहे. याचा त्यांच्या सामाजीक, आर्थिक जीवनावर अधिक प्रभाव पडतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद बंगळुरू संचालक डॉ. एस. सी. शर्मा यांनी केले.

२२ विद्यार्थ्यांना २८ सुवर्ण पदके व ६९ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान-

दिक्षांत समारंभात २२ विद्यार्थ्यांना २८ सुवर्ण पदके व ६९ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य व विद्यापीठाचे विविध प्राधिकरणाचे सदस्य, दानदाते तसेच गडचिरोली व चंद्रपुर जिल्हातील प्रतिष्ठीत नागरीक, विद्यापीठासी संलग्नीत विविध महाविद्यालयाचे अध्यक्ष, सचिव, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदिनी या कार्यक्रमाचा आभासी पद्धतीने लाभ घेतला. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. शिल्पा आठवले व डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार विद्यापीठाचे कुलसचिव, डॉ. अनिल चिताडे यांनी केले.

हेही वाचा- केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाणार

हेही वाचा- जाणून घ्या, केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी महाराष्ट्राच्या अपेक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.