ETV Bharat / state

'लसीकरण व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून कोरोनासंसर्ग टाळणे शक्य'

author img

By

Published : May 1, 2021, 5:21 PM IST

राज्यमंत्री यड्रावकर
राज्यमंत्री यड्रावकर

जिल्हयातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे तसेच प्रशासनाने रुग्णांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध घेवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, यातूनच आपण कोरोना संसर्ग टाळू शकतो असे प्रतिक्रिया राज्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. आज गडचिरोली जिल्हा मुख्यालयामध्ये त्यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

गडचिरोली - जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे तसेच प्रशासनाने रुग्णांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध घेवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, यातूनच आपण कोरोना संसर्ग टाळू शकतो असे प्रतिपादन राज्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर केले आहे. आज गडचिरोली जिल्हा मुख्यालयामध्ये त्यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते.

'लसीकरण व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून कोरोना संसर्ग टाळणे शक्य'

'जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची निर्मिती'
राज्यमंत्री म्हणाले कोरोना काळात जिल्ह्यात अनेक प्रकारे आरोग्य विषयक सोयी सुविधा निर्माण केल्या जात आहेत. गडचिरोली जिल्हा आदिवासी, दुर्गम व नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा या जिल्हयात आरोग्य सुविधांबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. सध्या या प्रश्नावर प्रशासनाने मार्ग काढून जिल्हा रूग्णालयापासून ते ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा उभारण्याचे कार्य हाती घेतले आहे. आयसीयू, शस्त्रक्रीया विभागाचे लोकार्पण नुकतेच जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. तसेच रुग्णालयातील दंत विभाग, आकस्मिक विभाग, फिजीओथेरपी विभाग, प्रतिक्षालय, औषधी भांडार आणि सुसज्ज वस्त्र धुलाई उभारणीसाठी कामे केली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय हे जिल्हयातील प्रमुख व एकमेव संपुर्ण आरोग्य सेवा देणारे माध्यम आहे. याच्या अधिक सोयी सुविधांनी नुतणीकरण केले जात आहे. तसेच उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयांचे बळकटीकरणही केले जात आहे.

'नक्षलवाद कमी झाला'
जिल्हयात नक्षलवाद नेहमीच विकासाच्या आड येताना आपण पाहत आहे. परंतू आता जिल्ह्यात नक्षलवाद कमी होत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. हे वर्ष गडचिरोली पोलीस दलासाठी महत्त्वाचे व यशस्वी वर्ष ठरले आहे. ग्रामपंचायत निवडणूका अतिशय शांततेत पहिल्यांदाच पार पाडल्या गेल्या. यावर्षी चकमकीत 7 नक्षली मारले गेले, 4 जणांना अटक केली तर 4 जणांनी आत्मसमर्पण केले. अशा प्रकारे विविध विकासात्मक कामातून, पोलीस प्रशासनाच्या लढ्यातून, जिल्हा प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनातून महाराष्ट्र राज्यातील हिरवाई असलेला गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट देवून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी लसीकरण, रुग्णांवरील उपचार, औषधांचा पुरवठा व ऑक्सिजन पुरवठा याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, डॉ. सोळंकी, डॉ. विनोद मशाखेत्री, डॉ. बागराज दुर्वे उपस्थित होते. राज्यात असे लक्षात आले आहे की बहुतेक करून रुग्ण ग्रामीण भागात तालुकास्तरावरील खासगी डॉक्टरांकडून उपचार घेत आहेत. मात्र यावेळी संबंधित डॉक्टरांशी संवाद साधून कोरोनाबाबत लक्षणे असल्यास रुग्णांना तातडीने चाचणी करून घेण्याचे निर्देश सर्व डॉक्टरांना द्या, असे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित आरोग्य विभागाला दिले. अशा परिस्थितीत कोरोना रुग्ण उशिरा शासकीय दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करणे कठीण होते. यासाठी वेळेत उपचार करणे आवश्यक असल्याने संबंधित सर्व खासगी डॉक्टरांना प्रत्येक रुग्णाची कोरोना बाबतची लक्षणे तपासण्यास सांगून इतर आवश्यक सूचनाही द्याव्यात, अशा सूचना राज्यमंत्री यांनी या बैठकीत दिल्या.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपाध्यक्ष मनोहर पोरेटी पाटील, अतिरीक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरीक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तळपाडे उपस्थित होते. यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जनतेला उद्देशून राज्यमंत्री यांनी संदेश दिला.

हेही वाचा - 'कोरोना' संकटाविरुध्द एकजुटीने लढू; महाराष्ट्र दिनी अजित पवारांचा निर्धार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.