ETV Bharat / state

धुळ्यात ट्रकच्या धडकेत शालेय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

author img

By

Published : Jul 25, 2019, 1:24 PM IST

गुंजन देविदास पाटील (१४) असे मृत मुलीचे नाव आहे. ती कमलाबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी असून नव्वीत शिकत होती. तिला ट्रकने जबर धडक दिल्याने तिचा मुत्यू झाला.

मृत गुंजन देविदास पाटील

धुळे- ट्रकने धडक दिल्याने शालेय विद्यार्थिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साक्री रोडवरील सिंचन भवनजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अपघातानंतर नागरिकांनी महामार्गावर प्रचंड गर्दी केली होती.

गुंजन देविदास पाटील (१४) असे मृत मुलीचे नाव आहे. ती कमलाबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी असून नववीत शिकत होती. (जी.जे ०१ सी.वाय २६७) क्रमांकाचा ट्रक अहमदाबादहून मलकापूरकडे जात होता. ट्रक धुळ्यातून मार्गस्थ होत असताना हा अपघात झाला. घटनेनंतर परिसरात गर्दी जमा झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून ट्रकचालक स्वत:हून शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, गुंजनची शाळा दुपारची असल्याने सकाळी ती क्लासला जात असल्याचे सांगण्यात आले.

Intro:अहमदाबादहून मलकापूर कडे जाणाऱ्या ट्रकने धुळे शहराजवळील सिंचन भवन जवळ एका शालेय विद्यार्थिनीला जोरदार धडक दिली. ह्या अपघातात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.या अपघातानंतर नागरिकांनी महामार्गावर प्रचंड गर्दी केली होती.Body: भरधाव वेगाने येणाºया ट्रकने शाळकरी मुलीला जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू ओढवल्याची दुर्घटना गुरुवारी सकाळी साक्री रोडवरील सिंचन भवनजवळ घडली़ गुंजन देविदास पाटील (१४) असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे़ ती कमलाबाई कन्या शाळेची विद्यार्थीनी असून नववी इयत्तेत शिकत होती़ जीजे ०१ सीवाय २६७ क्रमांकाचा ट्रक हा अहमदाबादहून मलकापूरकडे जात होता़ हा ट्रक धुळ्यातून मार्गस्थ होत असताना हा अपघात झाला़ घटनेनंतर परिसरात गर्दी जमा झाली होती़ घटनेचे गांभिर्य ओळखून ट्रकचालक स्वत:हून शहर पोलीस ठाण्यात हजर झाला़ दरम्यान, गुंजन हिचा शाळा दुपारची असल्याने सकाळी ती क्लास जात असल्याचे सांगण्यात आले़ Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.