ETV Bharat / state

Cabinet Expansion In Maharashtra : मंत्रिमंडळ स्थापनेसाठी 'आप'चे एकविरा देवीला साकडे

author img

By

Published : Jul 26, 2022, 6:03 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Aknath Shinde ) सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन होऊन राज्याचा गाडा सुरळीत चालण्यासाठी आम आदमी पक्षानं ( Aam Aadmi Party ) एकविरा देवीला ( Ekvira Devi ) साकडं घातल्यानं धुळ्यातील राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत .

Aam Aadmi Party prayed to Ekvira Devi
आम आदमी पार्टीने एकवीरा देवीची प्रार्थना केली

धुळे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचं ( Chief Minister Aknath Shinde ) मंत्रिमंडळ स्थापन होऊन राज्याचा कारभाराचा गाडा सुरळीत चालण्यासाठी आम आदमी पक्षाच्या ( Aam Aadmi Party ) वतीनं धुळ्यातील एकविरा देवीला ( Ekvira Devi ) सोमवारी साकडं घालण्यात आलं. शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ स्थापन होऊन राज्याचा कारभाराचा गाडा सुरळीत चालण्यासाठी आम आदमी पक्षानं देवीला साकडं (Ekvira Devi ) घातल्यानं धुळ्यातील राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत . राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो हाच संदेश या आम आदमी पक्षाच्या भूमिकेच्या माध्यमातून तर द्यायचा हा प्रयत्न तर नाही ना ? असा सवाल देखील राजकीय क्षेत्रात चर्चिला जातोय .

"आप" चे एकविरा देवीला साकडे - शिंदे सरकार स्थापन होऊन २५ दिवसांचा कालावधी लोटला मात्र, मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion ) झालेला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दोघंच सरकारची भूमिका निभावताहेत. राज्यातील अन्नदाता अर्थात शेतकरी नैसर्गिक संकटाला तोड देतोय. अतिवृष्टीने शेती क्षेत्राचं नुकसान ( Agricultural damage due to heavy rainfall ) झालंय. बनावट खत विक्रीवर सरकारच नियंत्रण नाही, विकास कामं थांबलेली आहेत. राष्ट्रीयकृत बँकांची शेतकऱ्यांप्रती अनास्था आहे. अशा एक ना अनेक समस्यांनी राज्यातील शेतकरी, नागरिक त्रस्त झालाय असे, आम आदमी पक्षानं म्हटलंय .

नागरिक त्रस्त - राज्यात मंत्रीमंडळ नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सरकारला देव "सद्बुद्धी देवो" यासाठी आम आदमी पक्षाच्या धुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी धुळे शहरातील एकविरा देवीला सोमवारी साकडं घातलं. शिंदे सरकार लवकर मंत्रिमंडळ तयार करो ,, शासनाचा कारभार सुरळीत पार पडो, शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण होवो, विकास कामे मार्गी लागो, अशी प्रार्थना आम आदमी पक्षाच्या वतीनं करण्यात आल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांनी सांगितलं. शेतकऱ्यांप्रती आम आदमी पक्षानं दाखवलेली आस्था याबद्दल दुमत नाही मात्र, शेतकऱ्यांचे बहुतांश प्रश्न हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात असे असतांना केवळ शेतकऱ्यांचं नांव पुढे करून शिंदे सरकारनं मंत्रिमंडळ स्थापन करावं यासाठी आम आदमी पक्षानं देवाला साकडं घातल्यानं धुळ्यातील राजकीय क्षेत्रातील मंडळींच्या भुवया उंचावल्या आहेत .

हेही वाचा - खळबळजनक! इच्छेविरुद्ध माझे लिंग परिवर्तन केलं; सोलापुरातील किन्नरचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.