ETV Bharat / state

Mass Self Immolation Dhule : प्रजासत्ताक दिनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

author img

By

Published : Jan 26, 2023, 6:53 PM IST

धुळे शहरातील चितोर रोड मिल परिसरातील तुळसाबाई यांच्या शेतात गेल्या 30-40 वर्षांपासून काही नागरिक राहत आहेत. धुळे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, भूमी अभिलेख कार्यालय यांना घराचा 7/12 वा हिस्सा सतत देण्याची विनंती केली जात आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. काहींनी त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिला.

Mass Self Immolation Dhule
Mass Self Immolation Dhule

प्रजासत्ताक दिनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

धुळे : मील परिसरातील चितोड रोडलगतच्या तुळसाबाई मळ्यातील रहिवाशांनी प्रजासत्ताक दिनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. ध्वजारोहण समारंभानंतर मिल परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काहींनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिस बंदोबस्तामुळे मोठा अनर्थ टळला. ध्वजारोहण समारंभानंतर या नागरिकांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तैनात असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना रोखून त्यांच्याकडून डिझेलचे कॅन जप्त केले.

आत्मदहनाचा प्रयत्न : काही आंदोलकांनी हे डिझेल स्वतःवर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सर्व आंदोलकांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेली 35 ते 40 वर्षे वास्तव्य असलेली अतिक्रमित घरे नियमानुकुल करुन घरांना हक्काचा सातबारा मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.

नागरिकांनी घोषणाबाजी - धुळे जिल्हाधिकारी, तसेच महानगरपालिका आयुक्त व भूमि अभिलेख कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. मात्र प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या नागरिकांनी प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण झाल्यानंतर मिल परिसरातील नागरिकांनी घोषणाबाजी करत स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

सर्व आंदोलक पोलिसांच्या ताब्यात : बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवले. त्यांच्याकडील डिझेलच्या बाटल्या ताब्यात जप्त करण्यात आल्या. मात्र काही आंदोलकांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, सर्व आंदोलकांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray in Thane : बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे ठाण्यात; बंडखोरांना दिला 'हा' इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.