ETV Bharat / state

MVA Woman Protest Chandrapur : मणिपूर मधील घटनेचा 'मविआ'च्या महिला संघटनानकडून निषेध आंदोलन

author img

By

Published : Jul 21, 2023, 9:24 PM IST

मणिपूर हिंसाचारात महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस (ग्रामीण), चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी तिन्ही पक्षांच्या विद्यमाने जिल्हाधिकारी विनय गौडा (जी.सी.) यांना संयुक्त निवेदन देण्यात आले.

MVA Woman Protest Chandrapur
चंद्रपूर निषेध आंदोलन

चंद्रपूर : मणिपूर येथे मागच्या चार महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. येथे 4 मे रोजी महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली. यानंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. काल समाज माध्यमातून आणि खासगी वाहिन्यांवर हा व्हिडिओ प्रसारित झाला. पीडित महिलांनी पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली. तरीसुद्धा मणिपूर सरकारकडून तत्काळ कोणतीही कारवाई झालेली नाही. ही घटना देशाला शरमेने मान खाली घालणारी आहे. त्यामुळे या घटनेची तात्काळ चौकशी होऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी कॉंग्रेस, राकॉं आणि शिवसेनेच्या वतीने चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.



बीरेन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी : मणिपूरमध्ये मागच्या चार महिन्यांपासून हिंसाचार धुमसत आहे; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत यावर काहीही बोलले नाहीत. काल महिलांवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यावर केवळ ८६ सेकंद पंतप्रधान यावर बोलले. मणिपूरमध्ये देखील भाजपचे सरकार आहे; पण तिथे भाजपचे मुख्यमंत्री बिरेन सिंह हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरले आहे. ज्या देशात महिलांना देवी मानले जाते त्या देशात महिलांची अशी नग्न धिंड काढल्या जात असेल तर नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत यासंबंधी निवेदन द्यावे, अशी मागणी महाविकास आघाडी संघटनेच्या महिला अध्यक्षांनी केली. महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य-ठेमस्कर, चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला जिल्हा संघटक उज्वला नलगे यांच्या नेतृवात हे आंदोलन करण्यात आले.

'या' पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : या आंदोलनाला चंद्रपूर महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष शीतल कातकर, उपाध्यक्ष लता बारापात्रे, उपाध्यक्ष मुन्नी मुमताज शेख, उपाध्यक्ष वाणी डारला, महासचिव मीनाक्षी गुजरकर, सचिव माला माणिकपुरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्ष शुभांगी साठे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पूजा शेरकी, जिल्हा सचिव निर्मला नरवाडे, संघटक सचिव सरस्वती गावंडे, चंद्रपूर तालुका अध्यक्ष अनिता मावलीकर, जिल्हासचिव शोभा घरडे, शिवसेना महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष वर्षा कोठेकर, शिवदूत निलिमा शिरे, कुसुम उदार, किरण वानखेडे, श्रुती कांबळे, मेहेक सय्यद, वैशाली जोशी, मंगला शिवरकर, सोनाली चंडुके, रजनी उईके, सुनीता मडावी, सुरेखा ठाकरे, पपिता गोहणे, साधना चांदेकर, चंद्रपूर सोशल मीडियाचे अध्यक्ष मुन्ना तावडे, नरेंद्र डोंगरे, प्रकाश देशभ्रतार यांच्यासह महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.