ETV Bharat / state

Naxalite Milind Teltumbde's Journey : नक्षलवादी मिलींद तेलतुंबडेचे चंद्रपूर कनेक्शन; नक्षलवादाची सुरुवात 'अशी'...

author img

By

Published : Nov 17, 2021, 7:36 PM IST

मिलिंद तेलतुंबडे याचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील राजूर या गावात 5 फेब्रुवारी 1964ला झाला. (Milind Teltumbde's Birthday) दहावी आणि आयटीआयचे शिक्षण घेतल्यानंतर तो वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1984ला धोपटाळा येथील खुल्या कोळसा खाणीत रुजू झाला. 13 नोव्हेंबरला गडचिरोलीतील झालेल्या पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत तब्बल 27 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले. (Naxalite Killed in Gadchiroli) यात जहाल आणि मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचादेखील समावेश होता.

milind teltumbde
नक्षलवादी मिलींद तेलतुंबडे

चंद्रपूर - 13 नोव्हेंबरला गडचिरोलीतील झालेल्या पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत तब्बल 27 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले. (Naxalite Killed in Gadchiroli) यात जहाल आणि मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचादेखील समावेश होता. (Naxalite Milind telumbde's Journey) मिलिंद तेलतुंबडे याचा नक्षलवादी चळवळीकडे वळण्याचा प्रवास हा चंद्रपूर येथून सुरू झाला.

पार्श्वभूमी -

मिलिंद तेलतुंबडे याचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील राजूर या गावात 5 फेब्रुवारी 1964ला झाला. (Milind Teltumbde's Birthday) दहावी आणि आयटीआयचे शिक्षण घेतल्यानंतर तो वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1984ला धोपटाळा येथील खुल्या कोळसा खाणीत रुजू झाला. दोन वर्षांनी त्याची बदली चंद्रपूर शहराजवळ असलेल्या पद्मापुर कोळसा खाणीत झाली. आधीच चळवळीत सक्रिय असलेल्या मिलिंद तेलतुंबडेचा संपर्क अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेचा राज्य सचिव अॅड. सृजन अब्राहमशी आला. याचवेळी तो नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित झाला. त्यानंतर संयुक्त खदान मजदूर संघ, इंडियन माईन वर्किंग फेडरेशन या संघटनांच्या माध्यमातून कामगार चळवळीत आपला प्रभाव टाकायला सुरुवात केली.

1994पूर्वी त्याने नवजीवन भारत सभा या संघटनेचे अध्यक्षपद देखील भूषवले. नक्षलसमर्थक बनल्यानंतर त्याने कोळसा खाणींचा पट्टा असलेल्या चंद्रपूर, वणी, उमरेड, नागपूर येथे आपला प्रभाव पाडायला सुरुवात केली. या माध्यमातून नक्षली विचारसरणीचा प्रसार तो करू लागला. तेलतुंबडे याने संघटनेच्या माध्यमातून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात एक मोठे कामगार आंदोलन उभारले. याला हिंसक वळण लागले होते. तेव्हाच तो पोलिसांच्या रडारवर आला. नक्षलसमर्थक असल्याची नोंद पोलीस दफ्तरी करण्यात आली. यानंतर वेकोली कोळसा खाणीतील गणपत नावाचे अधिकारी होते. ज्यांच्या खुनाचा प्रयत्न झाला. त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. आरोपी म्हणून मिलिंद तेलतुंबडे याचे नाव समोर आले. याचवेळी तो फरार झाला आणि तो थेट गडचिरोली येथे नक्षली चळवळीत सामील झाला. (Milind Teltumbde Joined Naxalite moment)

हेही वाचा - Naxalite Killed in Gadchiroli : गृहमंत्र्यांकडून पोलिसांचे अभिनंदन; म्हणाले, देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी

नक्षलवादी म्हणून प्रवास -

श्रीधर श्रीनिवासन याच्या अटकेनंतर महाराष्ट्र राज्य समितीचा सचिव म्हणून मिलिंद तेलतुंबडेला पदोन्नती मिळाली. त्यानंतर २०१२-१३मध्ये उत्तर गडचिरोली, गोंदिया, बालाघाट विभागाचा इंचार्ज म्हणून काम केले. एप्रिल २०१३मध्ये झालेल्या केंद्रीय समितीच्या चौथ्या अधिवेशनामध्ये पदोन्नती होऊन माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचे सदस्यत्त्व मिळाले. २०१६-१७मध्ये महाराष्ट्र राज्य समिती बंद करून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड या नवीन झोनची स्थापना करण्यात आली. त्याचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी त्याला देण्यात आली. २०२१मध्ये केंद्रिय कमेटी सदस्य व महाराष्ट्र मध्यप्रदेश छत्तीसगड झोनचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. गडचिरोली, गोंदिया, बालाघाट व राजनांदगांव या जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या हालचालीचे बारकाईने विश्लेषण करुन त्यांच्यावर मोठ मोठे स्फोट आणि हिंसक घटना घडवून आणण्याबाबत नियोजन करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड या नवीन झोनची निर्मीती करुन त्याभागात नक्षल चळवळ अधिक सक्रिय करुन पुर्नजिवीत करणे व नक्षल चळवळीचा विस्तार करण्याच्या उद्देशाने त्याला महाराष्ट्र राज्य समितीचे सचिवपद देण्यात आले होते. नक्षलवादी चळवळ शहरी भागात वाढविण्यासाठी त्याचा महत्त्वाचा सहभाग होता.

एकुण दाखल गुन्हे -

  • चकमकी - ४२
  • नागरिक खून - ७,
  • पोलीस खून - ४,
  • जाळपोळ - २
  • दरोडा - १ अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यात एकुण ६३ गुन्ह्यात सहभाग. (Milind Teltumbde Participated in 63 Crimes)
  • महत्त्वाचे गुन्हे -
  1. जांभुळखेडा ब्लास्ट - दिनांक ०१/०५/२०१९ रोजी पोस्टे पुराडा अंतर्गत जांभुळखेडा ब्लास्ट घडवून आणण्यात आलेला होता. त्यामध्ये एकूण १५ जवान शहीद झाले.
  2. कोपर्शी चकमक :- दिनांक १७/०५/२०२० रोजी कोपर्शी येथे झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक होनमाने व १ जवान शहीद झाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.