ETV Bharat / state

वाघाच्या बंदोबस्तासाठी सामूहिक कृतीदल स्थापन करा; धानोरकर दाम्पत्याची प्रशासनाला सूचना

author img

By

Published : Feb 19, 2022, 8:53 PM IST

दुर्गापूर परिसरातील वन्यजीवांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून संयुक्त कृतीदल स्थापन करावा. या परिसरातील ७ वाघ इतरत्र हलविण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावा. औद्योगिक व मानवी वसाहतीत फिरणाऱ्या वन्य स्वापदांना पकडण्याचे अधिकार क्षेत्र संचालकांना द्यावे. वेकोलि क्षेत्रात आतील भागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उंच्च मचानी उभारण्याच्या सूचना यावेळी धानोरकर दाम्पत्यांनी प्रशासनाला केल्या.

dhanorkar couples sugest to the administration to establish a collective task force for tiger control
वाघाच्या बंदोबस्तासाठी सामूहिक कृतीदल स्थापन करा

चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, उर्जानागर आणि दुर्गापूर परिसरात वाघाच्या हल्ल्यात मागील दोन दिवसांत दोन जणांचा नाहक बळी गेला. यासाठी महाऔष्णिक वीज केंद्र, वेकोली आणि वनविभागाने संयुक्त कृतीदल स्थापन करावे, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या आमदार पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाला केल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रामगावकर, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, उपविभागीय वनाधिकारी खाडे, निवासी जिल्हाधिकारी मेश्राम, वेकोलीचे महाक्षेत्रीय प्रबंधक कावळे, शाबीर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, गोपाल अमृतकर यांची उपस्थिती होती.

झाडी-झुडुपे लपण्यासाठी उपयुक्त

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा हिंस्र प्राण्यांसाठी नंदनवन ठरला आहे. येथे असलेली झाडी झुडुपे हे त्यांना लपण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. या परिसरात वाघ, बिबट व अस्वल या श्वापदांचा वावर असल्यास तो सहज दिसून येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झुडपांची साफसफाई करण्याची जबाबदारी हि वेकोलि व सि.एस.टी.पी.एस. यांची असून हੀ जबाबदारी त्यांनी तात्काळ पार पाडावी अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. विनाकारण जंगलपरिसरात प्रवेश न करणारे फलक रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात यावे. सि.एस.टी.पी.एस. ने ९०० मीटर सुरक्षा भिंतीचे काम तात्काळ करावे. सि.एस.टी.पी.एस. आणि दुर्गापूर परिसरातील वन्यजीवांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून संयुक्त कृतीदल स्थापन करावा. या परिसरातील ७ वाघ इतरत्र हलविण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावा. औद्योगिक व मानवी वसाहतीत फिरणाऱ्या वन्य श्वापदांना पकडण्याचे अधिकार क्षेत्र संचालकांना द्यावे. वेकोलि क्षेत्रात आतील भागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उंच्च मचानी उभारण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.