ETV Bharat / state

Chandrapur Students Stuck in Ukraine : 12 पैकी 10 विद्यार्थी युक्रेनहून स्वदेशी पोचले; दोघांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू

author img

By

Published : Mar 3, 2022, 6:10 PM IST

युक्रेनमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 12 विद्यार्थी (Indian Students from Ukraine) अडकले होते. त्यापैकी दहा जण हे सुखरूप स्वदेशी पोचले असून दोघा जणांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

russia ukraine
russia ukraine

चंद्रपूर : युक्रेनमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 12 विद्यार्थी (Indian Students from Ukraine) अडकले होते. त्यापैकी दहा जण हे सुखरूप स्वदेशी पोचले असून दोघा जणांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दहा पैकी सहा जण हे सुखरूप आपल्या घरी पोचले असून अन्य चार जण हे दिल्लीत पोचले असल्याची माहिती आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला चढवल्याने (Russia Ukraine Conflict) तिथे शिकायला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. युक्रेनमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून गेलेले 12 विद्यार्थी अडकले होते. यामध्ये हर्षल ठावरे, ऐश्वर्या खोब्रागडे, नेहा शेख, अदिती सायरे, धीरज बिस्वास, दिक्षराज अकेला, महेश भोयर, महक उके, साहिल भोयर, खुशाल बिस्वास, शेख अलिशा करीम, गुंजन लोणकर या 12 विद्यार्थ्यांचा समावेश होता.

दोन विद्यार्थी युक्रेनमध्येच

युक्रेनमध्ये हल्ले सुरू झाल्यावर काही भारतीय विद्यार्थ्यांनी युक्रेन सोडण्याचा निर्णय घेतला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे साहिल भोयर, खुशाल बिस्वास, शेख अलिशा करीम, गुंजन लोणकर हे विद्यार्थी सुखरूप आपल्या घरी पोचले. यानंतर स्थिती दिवसेंदिवस आणखी गंभीर होत आहे. त्यामुळे भारत सरकारने या विद्यार्थ्यांना स्वदेशी सुखरूप परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू केले. या मोहिमेत चंद्रपुरचे हर्षल ठावरे आणि अदिती सायरे हे विद्यार्थी परत आले. तर ऐश्वर्या खोब्रागडे, धीरज बिस्वास, महेश भोयर, महक उके हे विद्यार्थी विशेष विमानाने दिल्लीपर्यंत पोचले आहे. लवकरच ते आपल्या घरी पोचतील. मात्र, नेहा शेख आणि दिक्षराज अकेला हे अजूनही युक्रेनमध्येच आहेत. नेहा शेख ही विद्यार्थिनी हंगेरी बॉर्डर पर्यंत पोचली आहे. तर दिक्षराज हा रोमानिया बॉर्डरपर्यंत पोचत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - Satara Student Stuck In Ukraine : कराडच्या प्रतिक्षाने रोमानियातून साधला 'ईटीव्ही भारत'शी संवाद, सांगितला रोमांचक अनुभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.